कऱ्हाडला महात्मा गांधी पुतळ्याचा चष्मा गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:28 AM2021-07-18T04:28:04+5:302021-07-18T04:28:04+5:30

कराड शहरात प्रवेश करताना प्रवेशद्वारावरच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा आहे. या पुतळ्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. कारण कोणताही ...

Mahatma Gandhi statue spectacles disappear in Karhad | कऱ्हाडला महात्मा गांधी पुतळ्याचा चष्मा गायब

कऱ्हाडला महात्मा गांधी पुतळ्याचा चष्मा गायब

googlenewsNext

कराड शहरात प्रवेश करताना प्रवेशद्वारावरच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा आहे. या पुतळ्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. कारण कोणताही मोठा राजकीय, सामाजिक व्यक्ती ही प्रथम कराड शहरात येताना या पुतळ्याला अभिवादन करते. तसेच आंदोलनाची सुरुवात असो की निदर्शने असो लक्ष वेधण्यासाठीचे राजकीय लोकाचे ठिकाण म्हणजे गांधीजींचा पुतळा हे होय.

कराड नगरपालिकेच्या हद्दीत हा पुतळा आहे. मात्र अनेकदा पुतळ्याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे. शनिवारी १७ जुलै रोजी सकाळी या पुतळ्याचा चष्माच गायब झाला असून शोधण्यासाठी अर्ज देण्यात आला आहे. यावेळी कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्याशी चर्चाही केली आहे.

विटबंना टाळण्यासाठी सीसीटीव्ही बसवावे : प्रमोद पाटील

कराड शहरात चाैका- चाैकात पुतळे उभारण्यात आलेले आहेत. या पुतळ्यापासून लोकांना इतिहास माहीत व्हावा आणि त्यातून प्रेरणा मिळावी, हा उद्देश आहे. मात्र सामाजिक सलोखा राखण्यासाठी या पुतळ्याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळेच या पुतळ्याची विटंबना टाळण्यासाठी सीसीटीव्ही बसवावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील यांनी केलेली आहे.

Web Title: Mahatma Gandhi statue spectacles disappear in Karhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.