महात्मा फुले भाजी मंडईतच गाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:40 AM2021-02-16T04:40:26+5:302021-02-16T04:40:26+5:30
साताऱ्यातील महात्मा फुले भाजी मंडईत दर रविवारी आठवडी बाजार भरतो. ग्रामीण भागातून शेतकरी येत असल्याने मोठी गर्दी असते. त्यातच ...
साताऱ्यातील महात्मा फुले भाजी मंडईत दर रविवारी आठवडी बाजार भरतो. ग्रामीण भागातून शेतकरी येत असल्याने मोठी गर्दी असते. त्यातच दुचाकीस्वार गाड्या घेऊन आत जातात. त्यामुळे चालणेही अवघड होते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. (छाया : जावेद खान) १५जावेद५
-------------------आज भारनियमन
सातारा : वीज वितरण कंपनीने विद्युत भारनियमन पुन्हा सुरू केले आहे. गेल्या मंगळवारी दिवसभर वीजपुरवठा खंडित केला होता. या आठवड्यातही मंगळवार, दि. १६ रोजी सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत वीज खंडित असणार आहे. याबाबत मेसेज पाठविले आहेत.
----------------टाकी भरली तरी दुर्लक्ष
सातारा : साताऱ्यातील अनेक ठिकाणी दोन वेळेस पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे सध्यातरी पाण्याची कमतरता भासत नाही. पाण्याची टाकी भरून वाहत असते. तरीही सातारकर दुर्लक्ष करीत आहेत. असेच पाणी वाया जात असेल तर भविष्यात अडचणीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे वेळीच सावध होऊन पाण्याची बचत करण्याची गरज आहे.
--------------रंगीबेरंगी मास्क
सातारा : जिल्ह्यातील महाविद्यालये सुरू झाली आहेत. ती लवकरच पूर्ण क्षमतेने भरू शकतात. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयातील तरुणांच्या पसंतीस पडतील असे फॅशनेबल मास्क सातारा बाजारात दाखल झाले आहेत. ते खरेदी करण्यासाठी तरुणींची गर्दी होऊ लागली आहे.
-------------------
वणव्यामध्ये वाढ
सातारा : साताऱ्यातील अजिंक्यतारा, यवतेश्वरच्या डोंगराला वणवा लावला जात आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील ठिकठिकाणच्या डोंगरालाही आगी लावण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली आहे. यामुळे वनसंपदेची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे.
-----------------
कचराकुंडी गायब
दहीवडी : माण तालुक्यातील दहीवडी येथे काही ठिकाणी कचराकुंड्या ठेवण्यात आल्या होत्या. त्या गेल्या काही महिन्यांपासून गायब आहेत. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. अनेक ग्रामस्थ कचरा उघड्यावर टाकतात.