जनतेला कोरोनापासून वाचविण्याचे महेश शिंदेंकडून काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:28 AM2021-05-28T04:28:03+5:302021-05-28T04:28:03+5:30
वाठार स्टेशन : ‘आमदार महेश शिंदे यांना कोरोनापासून जनतेला वाचविण्याचे काम करावे लागत आहे. लोकसहभागातून व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने ...
वाठार स्टेशन : ‘आमदार महेश शिंदे यांना कोरोनापासून जनतेला वाचविण्याचे काम करावे लागत आहे. लोकसहभागातून व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने ते कुटुंबासह अहोरात्रपणे झटून कोरोना सेंटर उभारून झोकून देऊन काम करत आहेत. मतदारसंघातील जनतेला कोरोनापासून वाचविण्याचे पुण्याचे काम आमदार महेश शिंदे करीत आहेत, त्यांना जिल्ह्याच्या प्रशासनाचे सहकार्य राहील,’ असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
अंबवडे संमत वाघोली, ता. कोरेगाव येथे आमदार महेश शिंदे यांच्या प्रयत्नातून उभारलेल्या सत्तर ऑक्सिजनयुक्त बेडच्या श्री काडसिद्धेश्वर कोविड हॉस्पिटलची फीत कापून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. रुग्णालयाच्या सोहळ्यास परिसरातील नागरिक उपस्थित होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल कदम, श्री मुधाईदेवी शिक्षण संस्थेचे चेअरमन धनसिंग कदम, कोरेगाव मार्केट कमिटीचे माजी सभापती अजय कदम, सुनील खत्री, मुकुंद आफळे, भाजपाचे कोरेगाव तालुकाध्यक्ष संतोष कदम यांची उपस्थिती होती.
महेश शिंदे म्हणाले, ‘कोरेगावमध्ये ज्याप्रमाणे काडसिद्धेश्वर हॉस्पिटलमध्ये काम चालले आहे. त्याप्रमाणेच येथेही चांगले काम झाले पाहिजे. रुग्णांना जेवण इतर साहित्य तीन महिने पुरेल एवढे लोकसहभागातून मिळाले आहे. चांगले काम करणाऱ्याच्या पाठीशी जनता उभी राहते याचे हे उत्तम उदाहरण आहे. कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर दबाव आहे. कार्यकर्त्यांनी बाधितांना हाॅस्पिटलपर्यंत आणले पाहिजे. सर्वांना हातात हात घालून काम करावे लागेल. नुसतेच हाॅस्पिटल न उभारता आम्ही वैद्यकीय यंत्रणाही उभी केली आहे. कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील कार्यकर्त्यांचे पाठपुराव्यामुळे अंबवडे येथे अल्पावधीत हे हाॅस्पिटल उभारले आहे.
यावेळी प्रांताधिकारी ज्योती पाटील, नानासाहेब भिलारे, रत्नदीप फाळके, किशोर फाळके, वैभव सकुंडे, सरपंच शुभांगी सकुंडे, उपसरपंच सचिन सकुंडे, संजय सकुंडे, शामराव कदम, जितेंद्र कदम, नंदराज मोरे, चंद्रकांत पवार, सर्जेराव करपे, दीपक कदम, बबन कदम, पोपट भोज, तानाजी गोळे, नाना सकुंडे उपस्थित होते.