माहुली रस्ता खड्डेमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:41 AM2021-01-13T05:41:49+5:302021-01-13T05:41:49+5:30
सातारा : सातारा शहरातून क्षेत्र माहुलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालविणे अवघड झाले आहे. संबंधित ...
सातारा : सातारा शहरातून क्षेत्र माहुलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालविणे अवघड झाले आहे. संबंधित विभागाने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. कृष्णानगर येथील कालव्यापासून कृष्णा नदीच्या पुढील काही अंतरापर्यंतच्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. रात्रीच्यावेळी वाहने या खड्ड्यांमध्ये आदळत असल्याने अपघाताची भीती व्यक्त होत आहे. या रस्त्यावरील खड्डे डांबराने बुजवावेत, अशी मागणी होत आहे.
.................................................
वृक्षारोपणाची आवश्यकता
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा - पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला वृक्षारोपण करण्यात यावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींमधून होत आहे. सातारा-पंढरपूर मार्ग जिल्ह्यातील कोरेगाव, पुसेगाव, निढळ, गोंदवले, म्हसवडवरुन जातो. या मार्गाच्या बाजूला तीन वर्षांपूर्वी काही प्रमाणात झाडे होती. पण, महामार्गाच्या कामावेळी अनेक झाडे तोडण्यात आली. त्यामुळे सध्या रस्त्याच्या बाजूला अपवादात्मकच झाडे दिसतात. पर्यावरण संतुलनासाठी या महामार्गाच्या बाजूला वृक्षारोपण करुन संवर्धन करावे, अशी मागणी होत आहे.
....................................................