गरोदरपणात शारीरिकबरोबर मानसिक आरोग्य सुदृढ ठेवावे : पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:10 AM2021-03-13T05:10:37+5:302021-03-13T05:10:37+5:30
वाई : ‘धकाधकीच्या जीवनात महिलांना घरातील कामाबरोबर बाहेरील जबाबदाऱ्या पार पाडव्या लागतात. एक वर्षापासून कोरोनाचे संकट आहे. अशावेळी गरोदर ...
वाई : ‘धकाधकीच्या जीवनात महिलांना घरातील कामाबरोबर बाहेरील जबाबदाऱ्या पार पाडव्या लागतात. एक वर्षापासून कोरोनाचे संकट आहे. अशावेळी गरोदर महिलांनी शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्य सुदृढ राहील याची काळजी घ्यावी,’ असे मत समुपदेशक स्वाती पवार यांनी व्यक्त केले.
वाई येथील पाटील हॉस्पिटलमध्ये महिला दिनानिमित्त आयोजित मोफत गरोदर महिला तपासणी, साहित्य वाटप व मार्गदर्शन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी आरोग्य अधिकारी योजना तराळ, संचालक डॉ. अजय पाटील, डॉ. श्वेता पाटील, स्वाती भोसले यांची उपस्थिती होती.
आरोग्य अधिकारी डॉ. योजना तराळ, स्वाती भोसले यांनी मार्गदर्शन केले. संचालिका डॉ. श्वेता पाटील यांनी पाटील हॉस्पिटल राबवित असलेले सामाजिक उपक्रमाविषयी माहिती दिली. आरोग्य सेविका ललिता नवघणे, प्रीती शिर्के यांनी स्वागत गीत सदर केले. यावेळी ५५ गरोदर महिलांची मोफत आरोग्य, रक्त, लघवी तपासणी करून गरोदरपणात लागणारे साहित्य मोफत वाटप करण्यात आले. (वा.प्र.)
फोटो
११ वाई-एडीव्हीटी
वाई येथे महिला दिनानिमित्त महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी स्वाती पवार यांचे डॉ. श्वेता पाटील यांनी स्वागत केले.