साताºयात तिसºया दिवशीही बंदोबस्त कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 07:37 PM2017-10-08T19:37:43+5:302017-10-08T19:38:44+5:30
सुरुचिवर शुक्रवारी रात्री झालेल्या धुमश्चक्रीनंतर साताºयात तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला असून, हा बंदोबस्त सलग रविवारी तिसºया दिवशीही वाढविण्यात आला आहे.
सातारा, 8 : सुरुचिवर शुक्रवारी रात्री झालेल्या धुमश्चक्रीनंतर साताºयात तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला असून, हा बंदोबस्त सलग रविवारी तिसºया दिवशीही वाढविण्यात आला आहे.
आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या सुरुचि बंगल्यावर शुक्रवारी रात्री जोरदार राडा झाला होता. खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या समर्थकांसह सुरुचिवर जाण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी गाड्यांची तोडफोड आणि गोळीबारीचे प्रकारही घडले होते.
या घटनेमुळे साताºयात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी दोन्ही राजेंसह त्यांच्या ३०० समर्थकांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, सध्या पोलिसांच्या हाती पाच कार्यकर्ते लागले आहेत. राजेंच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरूच आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजेंचे चार आणि खासादार उदयनराजेंचा एक कार्यकर्ता पोलिसांनी पकडला आहे.
बरेच कार्यकर्ते साताºयातून गायब झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी पथके रवाना केली आहेत. त्यातच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आपल्या समर्थकांसह कोणत्याही क्षणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात हजर होण्याची शक्यता असल्याने पोलिसांना सतर्क राहावे लागत आहे.
दरम्यान, पोलिसांनी रविवारी सकाळपासूनच शहर व परिसरात बंदोबस्त तैनात केला आहे. सुरुचि बंगल्यावर पोलिसांनी आणखीनच कुमक वाढविली आहे. बसस्थानक, पोवई नाका, मोती चौक, राजवाडा आदी ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. प्रत्येक वाहन पोलिस तपासून सोडत आहेत. सुरुचिकडे जाणारी वाहतूक सलग तिसºया दिवशीही बंद आहे.