चिंता मिटली, सातारा जिल्ह्यातील धरणे भरली

By नितीन काळेल | Published: August 29, 2024 06:59 PM2024-08-29T18:59:55+5:302024-08-29T19:00:40+5:30

सातारा : जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून पाऊस होत असून पश्चिमेकडे जोर अधिक राहिला. यामुळे प्रमुख मोठ्या प्रकल्पात १४५ टीएमसीवर ...

Major dams in Satara district were filled | चिंता मिटली, सातारा जिल्ह्यातील धरणे भरली

चिंता मिटली, सातारा जिल्ह्यातील धरणे भरली

सातारा : जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून पाऊस होत असून पश्चिमेकडे जोर अधिक राहिला. यामुळे प्रमुख मोठ्या प्रकल्पात १४५ टीएमसीवर पाणीसाठा झाला आहे. धरणे काठावर आली आहेत. तसेच कोयना, धोम, उरमोडी, बलकवडी, तारळी धरण ९६ टक्क्यांवर भरले आहे. यामुळे वर्षभराची चिंता मिटलेली आहे.

जिल्ह्यात मान्सूनच्या पावसावर शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे. यासाठी मान्सूनच्या पावसाकडे सर्वांच्याच नजरा असतात. जून महिन्यात वेळेवर पाऊस सुरू झाला तर पुढे फारशी चिंता राहत नाही. कारण, पेरण्यांना वेळेवर सुरूवात होते. तसेच धरण, पाझर तलावातही पाणीसाठा वाढतो. मागीलवर्षी मात्र, पावसाने चिंता वाढवली होती. वार्षिक सरासरीच्या ७० टक्क्यांपर्यंतच पाऊस झाला होता. यामुळे कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी या सारखी मोठे पाणीप्रकल्प भरले नव्हते. तर पाऊस कमी झाल्याने दुष्काळस्थिती निर्माण झालेली. दुष्काळ निवारणासाठी या मोठ्या प्रकल्पातून पाणी सोडण्यात आलेले. त्यावेळी धरणे तळाला गेली होती. त्यामुळे यंदा धरणे भरणार का ? अशी चिंता होती. पण, मागील तीन महिन्यांत सतत पाऊस झाल्याने पाण्याचा प्रश्न निकाली लागला आहे.

पश्चिम भागात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी असे प्रमुख सहा मोठे प्रकल्प आहेत. या प्रकल्पात १४८.७६ टीएमसी पाणीसाठा होतो. तर पूर्व भागातही नेर, आंधळी, पिंगळी, राणंद, येळीव असे लहान प्रकल्प आहेत. यावर्षी या सर्वच प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झालेला आहे. पश्चिमेकडील सर्वच प्रमुख धरणे काठावर आली आहेत. या सहा प्रकल्पात सध्या १४५.४५ टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. त्यामुळे धरणे भरल्यातच जमा आहे. त्यातच पाऊस होत असल्याने धरणात आवक कायम आहे. पण, पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग करावा लागतोय. सर्वात मोठे कोयना धरण आहे. १०५.२५ टीएमसी क्षमता धरणाची आहे. या धरणातील पाणीसाठा १४३ टीएमसीवर गेला आहे. हे धरण ९८.२५ टक्के भरलेले आहे. तसेच धोम, बलकवडी, तारळी, उरमोडी ही धरणेही काठावर आलेली आहेत. यामुळे विसर्ग करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील धरण पाणीसाठा (टीएमसीमध्ये)

धरण - यंदा साठा - टक्केवारी - एकूण क्षमता
कोयना - १०३.४१ - ९८.२५ - १०५.२५
धोम - १३.०९ - ९६.४५ - १३.५०
बलकवडी - ३.९३ - ९६.१९ - ४.०८
कण्हेर - ९.६९ - ९५.७२ - १०.१०
उरमोडी - ९.६० - ९६.२२ - ९.९६
तारळी - ५.७३ - ९७.९४ - ५.८५

मागीलवर्षी १२२ टीएमसी पाणीसाठा..

जिल्ह्यात मागीलवर्षी २८ आॅगस्टपर्यंत प्रमुख सहा प्रकल्पात १२१.९१ टीएमसी पाणीसाठा झाला होता. यामध्ये तारळी, धोम, बलकवडी आणि कण्हेर धरणांत चांगला साठा होता. तर कोयना धरणात ८१ टक्क्यांवर पाणीसाठा होता. तर उरमोडी धरणात अवघे ६ टीएमसी पाणी होते. त्यातच सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी झालेला. त्यामुळे धरणांत मोठ्या प्रमाणावर साठा वाढला नव्हता. परिणामी धरणे पूर्णपणे भरली नव्हती.

Web Title: Major dams in Satara district were filled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.