खेडेगावातील मिनल सैन्यदलात मेजर हनुमानवाडीची युवती : सायकलच्या जमान्यात दुचाकी सवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 10:37 PM2018-05-23T22:37:47+5:302018-05-23T22:37:47+5:30
उंब्रज : खेडेगावात तिचा जन्म झाला. ज्या काळात मुली सायकलवरून फिरायलाही धजावत नव्हत्या त्या काळात ‘ती’ दुचाकीवरून दिमाखात कॉलेजला जायची; पण हा रुबाब केवळ
उंब्रज : खेडेगावात तिचा जन्म झाला. ज्या काळात मुली सायकलवरून फिरायलाही धजावत नव्हत्या त्या काळात ‘ती’ दुचाकीवरून दिमाखात कॉलेजला जायची; पण हा रुबाब केवळ दिसण्यात नव्हता तर शिक्षणातही होता. शहरी, ग्रामीण अशा सर्व अडथळ्यांना पार करत ती शिकली आणि शिकून मेजर पदापर्यंत पोहोचली. कºहाड तालुक्यातील हनुमानवाडीच्या मेजर मिनल शिंदे-चव्हाण यांची ही यशोगाथा ग्रामीण मुलींसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
हनुमानवाडी येथील मिनल शिंदे-चव्हाण या आज सैन्यदलात मेजर या पदावर देशसेवेत आहेत. त्यांना नुकताच ‘साहसरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. मिनल शिंदे या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत, माध्यमिक शिक्षण उंब्रजला झाले. मात्र, मिनल या दुचाकीवरून महाविद्यालयात यायच्या. त्यावेळी अनेकजण आश्चर्य व्यक्त करायचे. मिनलने अधिकारी व्हावे, हे वडिलांचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्याच्या जिद्दीने मिनल शिक्षण घेत होत्या. त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. त्याचवेळी त्यांना सैन्यदलात प्रवेश घेण्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड ही परीक्षा असते, हे समजले. त्या परीक्षेसाठी त्यांनी ग्रंथालयातून पुस्तके मिळवून अभ्यास सुरू केला. मेहनत, कष्टाच्या जीवावर मिनल यांची लेफ्टनंट म्हणून निवड झाली. त्यानंतर सहा महिन्यांचे प्रशिक्षण चेन्नई येथे झाले. मिनल देशसेवेत रुजू झाल्या.