जिल्ह्यातील प्रमुख सहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:35 AM2021-01-21T04:35:40+5:302021-01-21T04:35:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षी चार महिने पाऊस झाल्याने तलाव, धरणे भरली. सद्यस्थितीत जिल्ह्यातील प्रमुख सहा ...

The major six in the district | जिल्ह्यातील प्रमुख सहा

जिल्ह्यातील प्रमुख सहा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षी चार महिने पाऊस झाल्याने तलाव, धरणे भरली. सद्यस्थितीत जिल्ह्यातील प्रमुख सहा धरणांमध्ये १२२.१३ टीएमसी इतका पाणीसाठा आहे तर कोयना धरणात जवळपास ८६ टीएमसी म्हणजेच ८१.६८ टक्के साठा आहे. त्याचबरोबर सध्या काही धरणांमधून सिंचनासाठीही विसर्ग सुरू आहे. पण, अजूनही मोठ्या प्रमाणात सिंचनासाठी पाणी सुरू नाही.

जिल्ह्यात २०१९मध्ये पाच महिने पाऊस झाला होता. त्या तुलनेत गेल्यावर्षीही चांगला पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यापासून सतत पाऊस पडत होता. त्यामुळे धरणांमध्येही वेगाने पाणीसाठा वाढू लागला. पश्चिम भागात तर काही दिवस धुवाँधार पाऊस पडला. यामुळे कोयना, धोम, बलकवडी, उरमोडी, कण्हेर, तारळीसारख्या धरणात वेगाने पाणीसाठा वाढला. त्यातच पाऊस सुरू असल्याने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला होता.

जिल्ह्यात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी आणि तारळी या प्रमख सहा धरणांची पाणी साठवण क्षमता १४८.७४ टीएमसी आहे. सद्यस्थितीत या धरणांमध्ये १२२.१३ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. अजूनही धरणात मोठ्या प्रमाणात पाणी आहे. त्यातच सिंचनासाठी रोटेशनप्रमाणे काही धरणांमधून पाणी सोडण्यात येत आहे.

जिल्ह्यातील बलकवडी धरणातून सिंचनासाठी ३३८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर कण्हेर धरणातूनही २०० क्युसेक पाणी पिकांसाठी सोडले जात आहे. तसेच कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

रब्बी हंगामातील पिकांना अजूनही धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत नाही. काही धरणांतून सिंचनासाठी पहिले आवर्तन झाले आहे. आगामी काळात मागणी आणि रोटेशनप्रमाणे सिंचनासाठी पाणी सोडण्यात येणार आहे तर महत्वाच्या ठरणाऱ्या कोयना धरणात अजूनही चांगला पाणीसाठा आहे.

चौकट :

सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा (टीएमसीमध्ये)

धरणे यावर्षी टक्केवारी एकूण क्षमता

धोम ११.३३ ८३.९४ १३.५०

कण्हेर ७.२४ ७१.७० १०.१०

कोयना ८५.९७ ८१.६८ १०५.२५

बलकवडी २.९० ७१.१४ ४.०८

उरमोडी ९.६५ ९६.८९ ९.९६

तारळी ५.०४ ८६.१९ ५.८५

...........................................................

Web Title: The major six in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.