महाबळेश्वर सुशोभीकरणाचा आराखडा नव्याने तयार करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना

By जगदीश कोष्टी | Published: August 29, 2022 07:25 PM2022-08-29T19:25:46+5:302022-08-29T19:26:23+5:30

व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची व्यथा मांडली.

Make a new plan for beautification of Mahabaleshwar says Chief Minister Eknath Shinde instructions | महाबळेश्वर सुशोभीकरणाचा आराखडा नव्याने तयार करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना

महाबळेश्वर सुशोभीकरणाचा आराखडा नव्याने तयार करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना

googlenewsNext

महाबळेश्वर : ‘महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेचे सुशोभीकरण करताना स्थानिक भूमिपुत्र व्यावसायिकांवर कोणत्याही प्रकारे अन्याय होणार नाही, अशा प्रकारे महाबळेश्वर सुशोभीकरणाचा आराखडा पुन्हा नव्याने तयार करा,’ अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व पालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांना केल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांच्या विश्रांतीसाठी सहकुटुंब महाबळेश्वर येथे आले होते. यामध्ये शनिवारी सायंकाळी राजभवन येथील दरबार हॉल येथे जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी महाबळेश्वर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या शिष्ठमंडळाने त्यांची भेट घेत सुशोभीकरणामुळे महाबळेश्वरच्या बाजारपेठेचे मूळ ब्रिटिशकालीन सौंदर्य नष्ट होण्याचा धोका आहे. या सौंदर्यामुळे महाबळेश्वरच्या अनेकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहणार आहे; म्हणून या सुशोभीकरणाच्या आराखड्याचा पुनर्विचार व्हावा, या मागणीसाठी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले. शिष्टमंडळात ॲड. संजय जंगम, शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, सतीश ओंबळे, प्रवीण भिलारे, शहरप्रमुख विजय नायडू, माजी उपनगराध्यक्ष अफझल सुतार, माजी नगरसेवक संदीप साळुंखे, अतुल सलागारे, विशाल तोष्णीवाल आदी उपस्थित होते.

या आराखड्याचा पुनर्विचार व्हावा, या मागणीसाठी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची व्यथा मांडली. मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यापाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकारी रुचेस जयवंशी व पालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्याकडे आराखड्याच्या तरतुदींविषयी माहिती घेतली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘सुशोभीकरण झाले पाहिजे; परंतु ते करीत असताना स्थानिकांना विश्वासात घेऊन केले गेले पाहिजे. स्थानिकांवर अन्याय होणार असेल तर सुशोभीकरणाचा उपयोग काय? या संपूर्ण सुशोभीकरणाचा आराखडा पुन्हा नव्याने तयार करून सादर करावा.

चार फुटांचे बांधकाम वाचणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयाने बाजारपेठेचे सुशोभीकरण सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्यावर करण्यात येणार असल्याने व व्यापाऱ्यांचे चार फुटांचे बांधकाम तुटणार नसल्याने व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. महाबळेश्वरमधून मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे कौतुक करून समाधान व्यक्त करण्यात आले.

Web Title: Make a new plan for beautification of Mahabaleshwar says Chief Minister Eknath Shinde instructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.