मल्हारराव होळकरांच्या मुरुम गावाला पर्यटनाचा ‘ब’ दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:04 AM2021-05-05T05:04:42+5:302021-05-05T05:04:42+5:30

फलटण : अटकेपार झेंडे लावणारे शूरवीर, पराक्रमी योद्धे मल्हारराव होळकर यांचे जन्मगाव मुरुम (ता. फलटण) पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित ...

Malharrao Holkar's Murum village has 'B' status of tourism | मल्हारराव होळकरांच्या मुरुम गावाला पर्यटनाचा ‘ब’ दर्जा

मल्हारराव होळकरांच्या मुरुम गावाला पर्यटनाचा ‘ब’ दर्जा

Next

फलटण : अटकेपार झेंडे लावणारे शूरवीर, पराक्रमी योद्धे मल्हारराव होळकर यांचे जन्मगाव मुरुम (ता. फलटण) पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात १ कोटी ६१ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे व्हाईस चेअरमन डी. के. पवार यांनी दिली.

महाराष्ट्र शासनाने मुरुम हे गाव पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्याच्या महाराष्ट्र विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या मागणीस मान्यता दिली आहे. तसेच ब क्षेत्राचा दर्जा देऊन पहिल्या टप्प्यात १ कोटी ६१ लाख रुपये मंजूर केले असून विकासकामाचा शुभारंभ ‘महानंद’चे व्हा. चेअरमन डी. के. पवार, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच प्रियंका योगेश बोंद्रे, उपसरपंच संतोष उत्तम बोंद्रे, वनिता संकपाळ व ग्रामस्थ उपस्थित होते.

महाराजा मल्हारराव होळकर यांनी मावळा प्रांत जिंकून अटकेपार झेंडे लावले. अशा शूरवीर सरदार महाराजा मल्हारराव होळकर यांचे जन्म गाव मुरुम असूनही त्याबाबत फारशी माहिती नव्हती. मात्र, गेल्या सात-आठ वर्षांपासून हे गाव महाराजा मल्हारराव होळकर यांचे जन्मगाव म्हणून राज्यात चर्चेत आले. मुरूम हे गाव पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याच्या रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या सकल्पनेमुळे त्याला आता देशपातळीवर प्रसिद्धी लाभली आहे.

या गावचा विविधांगी विकास करण्याची योजना रामराजे नाईक-निंबाळकर व फलटणच्या राजघराण्याच्या माध्यमातून आखली जात असताना राज्य शासनाने मुरुमला पर्यटन स्थळाचा दर्जा दिल्याने आगामी काळात मुरुमला राज्यस्तरावर वेगळे महत्त्व प्राप्त होईल, असा विश्वास डी. के. पवार व शंकरराव माडकर यांनी व्यक्त केला आहे. राज्य शासनाने पर्यटन क्षेत्र विकास कार्यक्रमातून पहिल्या टप्प्यात १ कोटी ६१ लाख रुपये मंजूर केले असून सातारा जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाच्या माध्यमातून मंजूर विकासकामे लवकरच पूर्ण करण्यात येतील याची ग्वाही सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली.

(चौकट)

निधीची अशी आहे तरतूद

या कामामध्ये ५० लाख ३४ हजार रुपये भक्त निवास, २८ लाख ३९ हजार रुपये सभा मंडप, ३० लाख ३० हजार रुपये नीरा नदी घाट, ८ लाख ३८ हजार रुपये स्वच्छतागृह, ४ लाख ३२ हजार पथदिवे आणि २९ लाख २८ हजार रुपयांची तरतूद अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरणच्या कामासाठी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग फलटणचे उपअभियंता सुनील गरुड यांनी दिली.

Web Title: Malharrao Holkar's Murum village has 'B' status of tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.