मलकापुरात कोरोनामुक्तीचा दर ९६.६ टक्क्यांवर!,मृत्यूदर ३.१ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 10:58 AM2021-01-04T10:58:33+5:302021-01-04T11:01:46+5:30
CoronaVirus Satara- गत पंधरा दिवसात मलकापूरात केवळ ४ जणच कोरोना बाधित आढळले आहेत. शहरात आत्तापर्यंत एकूण १ हजार ८६ बाधित झाले असून त्यापैकी १ हजार ८२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ३४ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
माणिक डोंगरे
मलकापूर : गत पंधरा दिवसात मलकापूरात केवळ ४ जणच कोरोना बाधित आढळले आहेत. शहरात आत्तापर्यंत एकूण १ हजार ८६ बाधित झाले असून त्यापैकी १ हजार ८२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ३४ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
चार रुग्ण रूग्णालयात उपचार घेत असून होम आयसोलेशनमध्ये कोणीही नाही. त्यामुळे मलकापूरात कोरोना मुक्तीचा दर वाढून ९६.६ टक्क्यांवर गेला आहे. शहराचा मृत्यूदर ३.१ टक्क्यावर स्थिर आहे. तर ०.३ टक्केच अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.
माझे कुटूंब, माझी जबाबदारी ही मोहीम प्रभाविपणे राबवल्यामूळे मलकापूरात गत दोन महिन्यात बाधितांचा आकडा झपाट्याने कमी होत आहे. तत्पुर्वी पहिल्या टप्प्यात एका महिन्यात शहरात ३१ रूग्ण झाले होते.
पालिका, शासन व आरोग्य विभागाने कोरोना लढ्याचे योग्य नियोजन व उपचाराने एक महिन्यातच शहरातील सर्व ३१ रूग्ण बरे झाले होते. मात्र एक महिन्याच्या विश्रांतीनंतर २६ जूनला पुन्हा दुसऱ्यांदा कोरोनाचा शिरकाव झाला. आणि चार महिने टप्प्याटप्प्याने रुग्ण वाढतच गेले.
आॅगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यातच कोरोनाने कहर केला होता. दिवसाला २५ ते ३० जण बाधित येत होते. आॅक्टोबर महिन्यात सुरवातीला दिवसाला १०-१२ जण तर शेवटी केवळ ३ ते ४ रूग्ण सापडले.
नोव्हेंबर महिन्यात दिवसाला सरासरी २ ते ३ जण बाधित येत होते. तर डिसेंबर महिन्यात केवळ १८ जणच बाधित सापडाल्याने दिवसाला एकही सापडला नाही. या महिन्यात काहीवेळेला आठ-आठ दिवस एकही कोरोनाचा रूग्ण सापडला नाही. याबरोबरच या महिन्यात एकही मृत्यू झाला नाही. शहरात हळुहळु संख्या कमी झाली असली तरी बाधित होण्याचे थांबले नसल्याने काळजी घेणे गरजेचे आहे.
... असे वाढले रुग्ण
१) २२ एप्रिल ते २४ मे : ३१
२) २५ मे ते २५ जून : ०
३) २६ जून ते २६ जुलै : ४३
४) २७ जुलै ते २६ आॅगस्ट : ३३८
५) २७ आॅगस्ट ते २६ सप्टेंबर : ४२८
६) २७ सप्टेंबर ते २७ आॅक्टोबला : १५९
७) २८ आॅक्टोबर ते २७ नोव्हेंबर : ६९
८) २८ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर : १८
मलकापूर लेखाजोखा
- एकूण : १०८६
- मृत्यू : ३५
- डिस्चार्ज : १०५१
- उपचारार्थ : ४
- आयसोलेट : ०