मलकापूर, हजारमाचीत वृक्षारोपण उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:24 AM2021-07-19T04:24:28+5:302021-07-19T04:24:28+5:30

मलकापूरच्या दत्तनगरमध्ये नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, नगरसेवक शहाजी पाटील, प्रशांत चांदे, सहायक कर निरीक्षक मनिषा फडतरे, तसेच ...

Malkapur, Hazaramachit tree planting in full swing | मलकापूर, हजारमाचीत वृक्षारोपण उत्साहात

मलकापूर, हजारमाचीत वृक्षारोपण उत्साहात

Next

मलकापूरच्या दत्तनगरमध्ये नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, नगरसेवक शहाजी पाटील, प्रशांत चांदे, सहायक कर निरीक्षक मनिषा फडतरे, तसेच हजारमाची प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात तहसीलदार अमरदीप वाकडे, सरपंच विद्या घबाडे, उपसरपंच प्रशांत यादव, ग्रामपंचायत सदस्य कल्याण डुबल, गजानन काळे, शरद कदम, पितांबर गुरव, निर्मला जिरगे, संगीता डुबल, सारिका लिमकर, गणेश घबाडे यांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आली.

पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन व्हावे, या उद्देशाने पद्मश्री डॉ.अप्पासाहेब धर्माधिकारी, सचिन धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृतिदिनप्रीत्यर्थ प्रतिष्ठानच्या वतीने विविध प्रकारची फळझाडे, औषधी झाडे लावली असून, झाडांच्या संरक्षणार्थ सभोवताली कुंपण करण्यात येणार आहे. दत्तनगर व हजारमाची या ठिकाणी जांभूळ, बेल, सीताफळ, चिंच, साग, फणस अशी फळझाडे, औषधी झाडे, जंगली अशा शंभर झाडांची लागवड करण्यात आली.

- चौकट

डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने गत बारा वर्षांपासून आत्तापर्यंत फळझाडे, औषधी वनस्पती, अशोक, सुरू, सिल्व्हा, वड, पिंपळ, आवळा, बेहडा आदी रोपांची लागवड करण्यात आली असून, प्रतिष्ठानच्या सदस्यांकरवी त्याचे संरक्षण, संवर्धन केले जात आहे. झाडे जगवून काही ठिकाणी झाडे हस्तांतरित करण्यात आली आहेत.

- कोट

रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान यासारख्या अनेकविध उपक्रमातून प्रशासनाला प्रतिष्ठानची नेहमीच मदत होत आहे. प्रतिष्ठानच्या उपक्रमास प्रशासन नेहमी सहकार्य करेल.

- अमरदीप वाकडे, तहसीलदार, कऱ्हाड

फोटो : १८केआरडी०३

कॅप्शन : हजारमाची, ता.कऱ्हाड येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

Web Title: Malkapur, Hazaramachit tree planting in full swing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.