मलकापूर नगराध्यक्षांचा राजीनामा
By admin | Published: October 5, 2014 12:12 AM2014-10-05T00:12:41+5:302014-10-05T00:12:52+5:30
विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर राजकीय भूकंप
मलकापूर : ‘मलकापूरच्या नगराध्यक्षा शारदा खिलारे यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला़ १७-० अशी एकहाती काँग्रेसची सत्ता असलेल्या मलकापूर शहरात हा एक राजकीय भूकंप आहे़ मलकापूर नगरपंचायतीत मनोहर शिंदे, डॉ़ अतुल भोसले व जयंंत पाटील यांची सत्ता आहे. नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षित असल्यामुळे शारदा खिलारे यांना दुसऱ्यांदा संधी देण्यात आली़ डॉ़ अतुल भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला़ तर मनोहर शिंदे काँग्रेसबरोबर आहेत. शनिवारी डॉ़ भोसले यांच्या प्रचारार्थ भाजपचे नेते विनोद तावडे यांच्या सभेत नगराध्यक्षा शारदा खिलारे यांच्यासह काही नगरसेवक भाजपच्या व्यासपीठावर उघडपणे उपस्थित होते़ दुपारनंतर राजकीय घडामोडींनी वेग घेतला आणि सायंकाळी खिलारे यांनी राजीनामा दिला. (प्रतिनिधी) सुनंदा साठेंंना मिळणार नगराध्यक्षपदी संधी मलकापूरचे नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षित आहे़ अनुसूचित जातीच्या केवळ दोनच नगरसेविका निवडून आल्या आहेत़ प्रथम शारदा खिलारे यांना नगराध्यक्षपद देण्यात आले होते़ त्यांच्या राजीनाम्यामुळे आता सुनंदा साठे यांना नगराध्यक्षपदाची संधी मिळणार आहे़