मलकापुरात संततधार पावसाने ठिकठिकाणी दलदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:27 AM2021-07-18T04:27:33+5:302021-07-18T04:27:33+5:30
मलकापूर : मलकापूरसह परिसरात संततधार पावसाने हजेरी लावली. चार दिवसांपासून पडलेल्या पावसामुळे शहरातील सखल भागातील मोकळ्या जागेत दलदल, तर ...
मलकापूर : मलकापूरसह परिसरात संततधार पावसाने हजेरी लावली. चार दिवसांपासून पडलेल्या पावसामुळे शहरातील सखल भागातील मोकळ्या जागेत दलदल, तर अनेक ठिकाणी शहरात सिमेंटच्या जंगलातील उरलेल्या शेतींचे तलाव बनले आहेत. अशा ठिकाणी बरेच दिवस पाणी साचून राहिल्यामुळे डुबलनगरसह शास्त्रीनगर व तुळजाईनगर परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. ठिकठिकाणी साचलेले पाणी व दलदलीमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
काही दिवसांपूर्वी ढगफुटीसदृश पावसाने हजेरी लावली. त्यानंतर वारंवार जोरदार पावसाच्या सरीसह संततधार पडलेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीचपाणी झाले होते. उपमार्गासह ठिकठिकाणी नाले ओव्हर फ्लो झाल्यामुळे रस्ते जलमय झाले होते. कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्यालगत मोरया काॅम्प्लेक्समधील दहा दुकानात, शिवछावा चौकातील गुरुकृपा अपार्टमेंटमधील देवकर हार्डवेअर दुकानासह पाच दुकानांत, तर स्वामी एंटरप्रायजेसच्या तळमजल्यात पाणी शिरल्याने मालासह फर्निचरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, तर मलकापूरसह परिसरात दाट लोकवस्ती वाढल्यामुळे सिमेंटचे जंगल तयार झाले आहे. असे असतानाही काही शेतकऱ्यांची शेती शिल्लक आहे. गेले काही दिवसांत झालेल्या संततधार पावसामुळे नैसर्गिक पाणी जाण्याच्या मार्गांवर ठिकठिकाणी अतिक्रमण झाल्यामुळे शिल्लक शेतीत मोठ्या प्रमाणावर पाणी साचून तलावच बनले आहेत.
शेतातील पाणी बाहेर न गेल्यामुळे शहरातील सखल भागातील मोकळ्या जागेत दलदल, तर अनेक ठिकाणी सिमेंटच्या जंगलातील उरलेल्या शेतींचे तलाव बनले आहेत. अशा ठिकाणी बरेच दिवस पाणी साचून राहिल्यामुळे डुबलनगरसह शास्त्रीनगर पूर्व व तुळजाईनगर परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. ठिकठिकाणी साचलेले पाणी व दलदलीमुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
चौकट -
साथरोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता
ढगफुटीसदृश पावसापासून आजपर्यंत संततधार पावसाने अक्षता मंगल कार्यालय, तुळजाईनगर परिसरात ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचून राहिल्यामुळे दलदल निर्माण झाली आहे. साचलेल्या पाण्यामुळे या भागात साथरोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
चौकट -
पालिकेने धूर फवारणी करावी
शहरात ठिकठिकाणी बरेच दिवस पाणी साचून राहिल्यामुळे डुबलनगरसह शास्त्रीनगर पूर्व व तुळजाईनगर परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. ठिकठिकाणी साचलेले पाणी व दलदलीमुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. तरी पालिकेने धूरफवारणी करावी अशी मागणी या परिसरातील नागरिक करीत आहेत.
चौकट (फोटो आहे)
उपमार्गालगतचे नाले तुंबल्याने घाणीचे साम्राज्य
बैलबाजार रस्ता ते डुबलनगर परिसरातील पावसाळ्यातील पाणी उपमार्गालगतच्या नाल्यात येते. यावर्षी महामार्ग देखभाल विभागाने उपमार्गालगतच्या नाल्यांची पावसाळ्यापूर्वी साफसफाई केली जाते. यावर्षी ती अजूनही झाली नसल्यामुळे ठिकठिकाणी नाले तुंबल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
फोटो १७मलकापूर
मलकापुरात आगाशिवनगर, लाहोटीनगर व डुबलनगर परिसरात अनेक ठिकाणी शेतात अनेक दिवसांपासून पाणी साचून राहिल्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. (छाया : माणिक डोगरे)
170721\img_20210717_150924.jpg
फोटो कॕप्शन
मलकापूरात आगाशिवनगर, लाहोटीनगर व डुबलनगर परिसरात अनेक ठिकाणी शेतात अनेक दिवसांपासून पाणी साचून राहिल्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. (छाया-माणिक डोगरे)