मलकापूर लसीकरण..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:48 AM2021-09-16T04:48:03+5:302021-09-16T04:48:03+5:30
लसीकरणासाठी नगराध्यक्षाच प्रत्यक्ष मैदानात मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे यांनी स्वतः नर्सिंगचे शिक्षण घेतलेले आहे. बुधवारी लसीकरणासाठी मैदानात उतरत येथील ...
लसीकरणासाठी नगराध्यक्षाच प्रत्यक्ष मैदानात
मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे यांनी स्वतः नर्सिंगचे शिक्षण घेतलेले आहे. बुधवारी लसीकरणासाठी मैदानात उतरत येथील भारती विद्यापीठात लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना स्वतः लसीचे डोस देत चौकशी केली. सकाळपासून दुपारपर्यंत १६४ महिलांसह वृद्ध नागरिकांना त्यांनी लस दिली.
चौकट..
एका दिवसात १ हजार १९८ नागरिकांना लस
मलकापूर शहरात बुधवारी भारती विद्यापीठ येथे लसीकरण सुरू होते. नगराध्यक्षा नीलम येडगे यांनी स्वतः नागरिकांना लसीचे डोस देण्यास सुरुवात केली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, राजेंद्र यादव, प्रशांत चांदे, मोहनराव शिंदे, आनंदी शिंदे, राजू मुल्ला, सागर जाधव यांच्यासह नोडल अधिकारी, आशासेविका, नगरसेवक उपस्थित होते.
कोट
पालिकेतील सर्व पदाधिकारी, अधिकारी, प्रभाग नोडल अधिकारी व आशा सेविकांसह कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे व काले प्राथमिक आरोग्य केद्राच्या सहकार्याने शहरातील लसीकरण मोहीम वेगात सुरू आहे. शहरात ७० टक्क्यांवर लसीकरण पूर्ण झाले आहे. शासनाकडून अपेक्षित लस उपलब्ध झाल्यास लवकरच १८ वर्षांवरील १०० टक्के नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे.
- मनोहर शिंदे, उपनगराध्यक्ष, मलकापूर
चौकट
एकूण लोकसंख्या
३८०००
१८ वर्षाखालील
१०५०४
खासगी लसीकरण केंद्र वगळता
१३५३६ पहिला डोस
३७३६ दुसरा डोस
फोटो कॅप्शन
मलकापूर पालिकेने काले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने एका दिवसात विक्रमी १ हजार १९८ नागरिकांना लस दिली. या विक्रमी कामाची दखल घेऊन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लसीकरण केंद्राला भेट देऊन कौतुक केले. (छाया : माणिक डोंगरे)