मलकापुरातील लसीकरण मोहीम राज्यात अव्वल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:48 AM2021-09-16T04:48:20+5:302021-09-16T04:48:20+5:30
माणिक डोंगरे मलकापूर : येथील नगरपालिकेचे शिस्तबद्ध नियोजन व काले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने आजअखेर १३ हजार ५३६ नागरिकांना ...
माणिक डोंगरे
मलकापूर : येथील नगरपालिकेचे शिस्तबद्ध नियोजन व काले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने आजअखेर १३ हजार ५३६ नागरिकांना मलकापुरातील लसीकरण केंद्रावर लस देण्यात आली. तसेच कृष्णा व सह्याद्री रुग्णालयासह खासगी लसीकरण केंद्रात लस घेतलेल्या नागरिकांची संख्या विचारात घेता, मलकापुरात सुमारे ७० टक्क्यांवर लसीकरण पूर्ण झाले आहे; तर एका दिवसात तब्बल १ हजार १९८ नागरिकांचे लसीकरण करून पालिका पातळीवर राज्यात अव्वल स्थान मिळवले आहे.
मलकापूर नगरपालिकेने कोरोना आटोक्यात ठेवण्यासाठी कसून प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांमुळे नगरपरिषदेचे प्रतिबंधित झोन कमी झाले आहेत. पालिकेने लसीकरण केंद्रांची पाहणी करून योग्य त्या सूचना दिल्या. नगरपालिकेने कोरोना रुग्णवाढ आटोक्यात ठेवण्यासाठी नेहमीच प्रभागनिहाय नोडल अधिकारी व आशा सेविकांमार्फत नियोजनबध्द प्रयत्न केले आहेत. त्याचप्रमाणेच लसीकरणासाठीही प्रभानिहाय प्रबोधन करून लसीकरणाचा वेग वाढविला आहे. शहरासाठी भारती विद्यापीठ विधी महाविद्यालय व श्रीमती प्रेमलाताई चव्हाण महिला विकास केंद्र, आगाशिवनगर या ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू आहेत. शहरातील ९ प्रभागांसाठी ९ नोडल अधिकाऱ्यांसह आशा सेविकांमार्फत सर्वेक्षण करून लसीकरणासाठी प्रबोधन करण्यात आले. त्यामुळे दोन्ही केंद्रांवर ७ एप्रिलपासून सुरू असून, आजआखेर १३ हजार ५३६ नागरिकांना मलकापुरातील लसीकरण केंद्रावर लस देण्यात आली. याशिवाय कृष्णा व सह्याद्री रुग्णालयांसह खासगी लसीकरण केंद्रात लस घेतलेल्या नागरिकांची संख्या विचारात घेता व एकूण लोकसंख्येच्या तुलनेत १८ वर्षांखालील १० हजार ५०४ लोकसंख्या वगळता साधारणतः शहरातील ७० ते ७५ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. पालिकेने एका दिवसात तब्बल १ हजार १९८ नागरिकांचे लसीकरण करून पालिका पातळीवर राज्यात अव्वल स्थान मिळविले आहे.
150921\img-20210908-wa0064.jpg
फोटो कॕप्शन
मलकापूर पालिकेने काले प्राथमिक आरोग्य केंद्राचौया सहकार्याने एका दिवसात विक्रमी १ हजार १९८ नागरिकांना लस दिली. या विक्रमी कामाची दखल घेऊन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लसीकरण केंद्राला भेट देऊन कौतूक केले. (छाया माणिक डोंगरे)