मलकापूरच्या मंडईचा वाद पुन्हा चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:54 AM2021-02-25T04:54:00+5:302021-02-25T04:54:00+5:30

येथील पालिकेच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या नावाने प्रशस्त भाजी मंडई १५ फेब्रुवारीला सुरू केली आहे. शेतकरी-व्यापारी या मंडईत भाजी ...

Malkapur's Mandai controversy on the rise again | मलकापूरच्या मंडईचा वाद पुन्हा चव्हाट्यावर

मलकापूरच्या मंडईचा वाद पुन्हा चव्हाट्यावर

Next

येथील पालिकेच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या नावाने प्रशस्त भाजी मंडई १५ फेब्रुवारीला सुरू केली आहे. शेतकरी-व्यापारी या मंडईत भाजी विक्री करत होते. ग्राहकही तेथे जाऊन मालाची खरेदी करत होते. मात्र, बुधवारी काही व्यापारी व शेतकऱ्यांनी कोयना वसाहत येथील गणपती मंदिरालगतच्या पालिकेच्या हद्दीतील रस्त्यावर मंडई भरवली. मलकापूर फाटा ते मंडई हे अंतर जास्त असल्याने तेथे ये-जा करण्यास त्रास होत असल्याचे कारण पुढे केले. रिक्षाभाड्यापोटी जास्त पैसे द्यावे लागत आहेत, ग्राहकही मंडईत येण्यास कुचराई करत आहेत, आदी कारणे संबंधित शेतकरी व व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आली. कोयना वसाहत येथे रस्त्यातच मंडई भरल्याचे समजल्यानंतर पालिका कर्मचारी त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी शेतकऱ्यांचे साहित्य ट्रॅक्टरमध्ये भरण्यास सुरुवात केल्याने मोठा गोंधळ उडाला. यावेळी कर्मचारी व शेतकरी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.

मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांनी त्याठिकाणी भेट दिली. त्यांनी शेतकरी व व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन गुरुवारी याबाबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर तणाव निवळला.

फोटो : २४केआरडी०४

कॅप्शन :

कोयना वसाहत येथे रस्त्यालगत बसलेल्या शेतकरी व व्यापाऱ्यांशी मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांनी चर्चा करून बैठकीचे आश्वासन दिले.

Web Title: Malkapur's Mandai controversy on the rise again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.