Satara: महिलेवर कोयत्याने वार करणाऱ्यास अटक, जखमी महिलेची प्रकृती चिंताजनक

By संजय पाटील | Updated: February 14, 2025 17:59 IST2025-02-14T17:57:43+5:302025-02-14T17:59:04+5:30

कऱ्हाड : प्रेमसंबंधातून महिलेवर कोयत्याने वार करणाऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केले. कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने वहागाव ...

Man arrested for stabbing woman with sickle, injured woman condition critical | Satara: महिलेवर कोयत्याने वार करणाऱ्यास अटक, जखमी महिलेची प्रकृती चिंताजनक

Satara: महिलेवर कोयत्याने वार करणाऱ्यास अटक, जखमी महिलेची प्रकृती चिंताजनक

कऱ्हाड : प्रेमसंबंधातून महिलेवर कोयत्याने वार करणाऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केले. कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने वहागाव येथे आज, शुक्रवारी पहाटे ही कारवाई केली. दरम्यान, कोयता हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पीडित महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर खाजगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

रविंद्र सुभाष पवार (वय ३५, रा. दांगट वस्ती, आगाशिवनगर) असे पोलिसांनी अटक केलेल्या हल्लेखोराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलकापूर-आगाशिवनगर येथील पीडित महिलेचे रवींद्र पवार यांच्याशी प्रेमसंबंध होते. गुरुवारी दुपारी रवींद्र हा संबंधित महिलेच्या घरात गेला होता. त्यावेळी बराचवेळ त्यांच्यात चर्चा सुरू होती. मात्र, काही वेळाने चिडून जाऊन रवींद्र याने स्वतःसोबत आणलेल्या कोयत्याने संबंधित महिलेवर वार केले.

त्यामध्ये गंभीर जखमी होऊन संबंधित महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली. यावेळी झालेल्या आरडाओरड्यामुळे परिसरातील नागरिक त्याठिकाणी जमले. त्याचवेळी हल्लेखोर रवींद्र पवार याने तेथून पळ काढला. नागरिकांनी जखमी महिलेला उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल केले.

घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा करून हल्लेखोराचा शोध सुरू केला. रात्री उशिरापर्यंत आगाशिवनगर डोंगर परिसरात त्याचा शोध घेतला जात होता. तसेच श्वान पथकामार्फतही त्याचा माग काढण्यात आला. दरम्यान, शुक्रवारी पहाटे रवींद्र पवार हा वहागावच्या हद्दीत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेत अटक केले. हल्ल्यापाठीमागील नेमके कारण तपासातून समोर येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Web Title: Man arrested for stabbing woman with sickle, injured woman condition critical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.