दुचाकी चोरीप्रकरणी माण तालुक्यातील दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 10:38 AM2019-12-19T10:38:03+5:302019-12-19T10:38:16+5:30
चोरीच्या दुचाकी अंगापूर वंदन (ता. सातारा) येथे विक्रीसाठी आलेल्या दोघांना सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. त्यांच्याकडून सुमारे अडीच लाखांच्या चोरीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
सातारा : चोरीच्या दुचाकी अंगापूर वंदन (ता. सातारा) येथे विक्रीसाठी आलेल्या दोघांना सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. त्यांच्याकडून सुमारे अडीच लाखांच्या चोरीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
कृष्णा रोहिदास भोंडवे (रा. राणंद, ता.माण) अविनाश कुलदीप चव्हाण (रा. मार्डी, ता. माण) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांकडे चोरीच्या दुचाकी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी वेळ न दवडता दोघांच्याही मुसक्या आवळल्या. राजगड पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल आहे. वेगवेगळ्या कंपनीच्या सुमारे अडीच लाख रुपये किमतीच्या तीन दुचाकी त्यांच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले असून ते उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर अधीक्षक धीरज पाटील यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्याला आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईमध्ये हवालदार दादा परिहार, राजू मुलाणी, पोलीस नाईक सुजीत भोसले, सागर निकम, संदीप कुंभार, रमेश चव्हाण, नितीराज थोरात, मिथून मोरे यांनी सहभाग घेतला.