माणच्या तहसीलदारांची वाळू तस्करांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 05:35 PM2019-09-05T17:35:18+5:302019-09-05T17:38:29+5:30
माणच्या तहसीलदार बी. एस. माने यांनी गुरुवारी पहाटे शिखर शिंगणापूर-दहिवडी रस्त्यावरील वावरहिरे येथे सापळा लावून विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई केली. त्याबरोबर सहा ब्रास अवैध वाळू जप्त केली आहे. तहसीलदारांच्या या कारवाईने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
म्हसवड : माणच्या तहसीलदार बी. एस. माने यांनी गुरुवारी पहाटे शिखर शिंगणापूर-दहिवडी रस्त्यावरील वावरहिरे येथे सापळा लावून विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई केली. त्याबरोबर सहा ब्रास अवैध वाळू जप्त केली आहे. तहसीलदारांच्या या कारवाईने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
याबाबत माहिती अशी की, अकलूजकडून सांगलीकडे विनापरवाना वाळू वाहतूक करणारा ट्रक जात असल्याची माहिती तहसीलदार बी. एस. माने यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास शिखर शिंगणापूर-दहिवडी रस्त्यावर वावरहिरे येथे सापळा लावून अवैधरीत्या वाळू वाहतूक करत सांगलीकडे निघालेला ट्रक (एमएच १२ क्यूडब्ल्यू ५२७०) पकडला. त्यावेळी ट्रकमध्ये सहा ब्रास वाळू आढळून आली.
या कारवाईत तहसीलदार माने, कोतवाल किसन गुजर, संजय सावंत, सचिन शिंदे सहभागी झाले होते. तहसीलदारांनी अनेकवेळा कारवाई करून वाळू तस्करांचे कंबरडे मोडले आहे. नियमित सुरू असलेल्या या कारवाईमुळे वाळू तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.