कॅन्सरला जिद्दीने हरवणारा माणूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 11:19 PM2019-02-03T23:19:13+5:302019-02-03T23:19:22+5:30
कॅ न्सरचा आजार झाला’ असं म्हटलं तरी अनेकांच्या छातीत धडकी भरते. एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाला तर त्याचा मृत्यूच होणारच, ...
कॅ न्सरचा आजार झाला’ असं म्हटलं तरी अनेकांच्या छातीत धडकी भरते. एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाला तर त्याचा मृत्यूच होणारच, असं जणू समीकरणंच बनलं आहे. मात्र, साताऱ्यातील श्रीकांत मसुते या वृद्धाने तोंडाच्या कॅन्सरशी चार वर्षे झुंज देऊन तो शंभर टक्के बरा केला. त्यावरच ते न थांबता तर त्यांनी ‘हॅँड क्रार्फ्ट’ वस्तू बनवण्याचा व्यवसाय सुरू करून पुन्हा जीवनाच्या नव्या इनिंगचा प्रारंभ केला आहे.
शरद पवार, युवराज सिंग, मनीषा कोईराला, सोनाली बेंद्रे आदी सेलिब्रिटींना कॅन्सर झाला. तर त्यांनी परदेशात जाऊन उपचार केला. त्यानंतर त्यांनी पुन्हा आयुष्याला सुरुवात केली. अनेकांना त्यांची उदाहरणे प्रेरणादायी वाटत असतात; पण अशी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे साताºयातही आहेत. त्यापैकीच श्रीकांत मसुते हे एक कॅन्सरग्रस्त व्यक्ती आहेत.
सन २०१० मध्ये मसुते यांच्या जिभेला इन्फेक्शन झाले होते. काही महिने केलेल्या विविध तपासणींमध्ये त्यांना तोंडाचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले. हे समजताच त्यांना व कुटुंबीयांना हादरा बसला. मूळचा कलाकार पिंड असलेल्या या माणसाने कॅन्सर आजाराशी संंबंधित असलेली सर्व पुस्तके वाचून काढली. काही दिवसांनंतर मुंबईतील टाटा कॅॅन्सर रुग्णालयातील उपचारदरम्यान त्यांना दुर्मिळात दुर्मीळ कॅन्सरचा आजार झाल्याचे समजले; पण हा माणूस खचला नाही. त्याच्या पाठीशी त्याची पत्नी राणी मसुते यांच्या खंबीर साथ होती.
त्यांनी स्वत: डॉक्टरांच्या स्वाधीन केले. डॉक्टर त्यांच्यावर उपचारांबरोबर संशोधनही करत होते. दरम्यान, उपचाराचा खर्च आणि दैनंदिन खर्च यासाठी लागणाºया पैशांसाठी त्यांनी कलात्मक वस्तू बनवण्याच्या छंदाला व्यावसायिक रूप देण्याचा निर्णय घेतला. उपचार घेत असताना होणाºया मानसिक व शारीरिक त्रासाला तोंड देत असताना कलात्मक वस्तू बनवण्यात ते आपला वेळ खर्ची करत होते. त्यातून त्यांना आर्थिक हातभारही मिळत होता.
योगासन, प्राणायमच्या जोरावर संवाद सुरू
टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या रुग्णांनी त्यांची जीप व संपूर्ण दात काढले. त्यामुळे त्यांचे बोलणे आणि चावून खाण्याची पूर्ण प्रक्रिया बंद झाली होती. ते हातवारे किंवा लिहून इतरांशी संवाद साधत होते. तर लिक्विड अन्न पित नित्यनियमाने औषध उपचार सुरू होते. डॉक्टरांच्या उपचारपद्धतीला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने त्यांचा आजार पूर्णपणे बराच झाला. त्याचबरोबर त्यांनी योगासन, प्राणायम याच्या जोरावर जिभेशिवाय बोलण्यास सुरुवात केली.
आज त्यांचा कॅन्सर शंभर टक्के बरा झाला असून, ते कलात्मक वस्तू बनवून त्याची विक्री करत आपला नव्या व्यवसायाला सुरुवात केली. त्याचबरोबर पूर्वीप्रमाणे त्यांचे दैनंदिन जीवन सुरू आहे.