माणला मिळणार आज वॉटर कप स्पर्धेत ‘मान’ ! जिल्ह्याचे लक्ष लागून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 11:25 PM2018-08-11T23:25:45+5:302018-08-11T23:26:10+5:30

राज्यात एप्रिल-मे महिन्यांत झालेल्या तिसऱ्या वॉटर कप स्पर्धेचा बक्षीस समारंभ रविवार, दि. १२ रोजी पुण्याच्या बालेवाडीत होत असून, माण तालुक्यातील भांडवली आणि टाकेवाडी ही दोनच गावे जिल्ह्यातून राज्यस्तरावर पोहोचली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वॉटर कप स्पर्धेत सहभागी १६० गावांचे या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाकडे लक्ष लागले आहे.

'Mana' in water cup competition today! Attend the District's attention | माणला मिळणार आज वॉटर कप स्पर्धेत ‘मान’ ! जिल्ह्याचे लक्ष लागून

माणला मिळणार आज वॉटर कप स्पर्धेत ‘मान’ ! जिल्ह्याचे लक्ष लागून

Next
ठळक मुद्देपुण्यात बक्षीस वितरण समारंभ; माण, खटाव, कोरेगावमधून शेकडो जण जाणार

सातारा/म्हसवड : राज्यात एप्रिल-मे महिन्यांत झालेल्या तिसऱ्या वॉटर कप स्पर्धेचा बक्षीस समारंभ रविवार, दि. १२ रोजी पुण्याच्या बालेवाडीत होत असून, माण तालुक्यातील भांडवली आणि टाकेवाडी ही दोनच गावे जिल्ह्यातून राज्यस्तरावर पोहोचली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वॉटर कप स्पर्धेत सहभागी १६० गावांचे या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाकडे लक्ष लागले आहे.

राज्यात गेल्या तीन वर्षांपासून अभिनेता आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या वतीने वॉटर कप स्पर्धा सुरू आहे. पहिल्यावर्षी या स्पर्धेला प्रतिसाद अल्पसा लाभला; पण या स्पर्धेमुळे लोकांना पाण्याचे महत्त्व समजून आले. पहिल्यावर्षी सातारा जिल्ह्यातील वेळू गावाने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. त्यामुळे जिल्ह्याचा डंका सर्वत्र वाजला. वेळूचा आदर्श घेत जिल्ह्यातील इतर अनेक गावांनी दुसºया वर्षीच्या स्पर्धेत सहभाग घेतला. त्यामधून डीपसीसीटी, नालाबांध, ओढ्यातील गाळ काढणे अशी कामे झाली. दुसºया वर्षीही जिल्ह्यातील अनेक गावांनी स्पर्धेत क्रमांक मिळविला.

यावर्षी तिसºया स्पर्धेतही जिल्ह्यातील माण, खटाव आणि कोरेगाव या तालुक्यांतील दीडशेहून अधिक गावे सहभागी होती. ८ एप्रिलपासून संबंधित गावात श्रमदानाचं तुफान आलं होतं. २२ मे रोजी मध्यरात्री १२ वाजताच हे तुफान थांबलं; पण या ४५ दिवसांच्या कामात लोकांनी जलसंधारणाचे मोठे काम केले होते. आता या वॉटर कप स्पर्धेचा निकाल रविवारी लागणार आहे.
वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांची दोन टीमने पाहणी केली. त्यानंतर राज्यस्तरावर १५ गावे पोहोचली होती. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातून माण तालुक्यातील भांडवली आणि टाकेवाडी या गावांचा समावेश होता. भांडवली गावाने माथा ते पायथा काम केले आहे.

जिल्ह्यात जलसंधारणाचे काम मोठे...
या वर्षीच्या वॉटर कपच्या तिसºया स्पर्धेत जिल्ह्यातील १६० च्यावर गावांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये माण तालुक्यातील ६६, खटावमधील ५७ आणि कोरेगाव तालुक्यातील ४२ गावांनी सहभाग घेतलेला. या सर्व गावांत जलसंधारणाचे मोठे काम झाले आहे. त्यातूनच जिल्ह्यातील दोन गावांची निवड राज्यस्तरावर झाली आहे.

पुणे येथे होणाºया सोहळ्यात सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत तालुका स्तरावरील गावांचा पुरस्कार सोहळा तर दुपारी तीन ते सहा या वेळेत राज्य स्तरावरील गावांचा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. दहिवडी येथे नुकताच स्पर्धेत सहभागी प्रत्येक घटकांचा गौरव झाला होता.

राज्यातील २४ जिल्ह्यांतील ७५ तालुके स्पर्धेत सहभागी
सुमारे ४,५०० गावांचा राहिला सहभाग
राज्यस्तरावर
१५ गावे पोहोचली
पश्चिम महाराष्ट्रातील
६, विदर्भ ४
आणि मराठवाडा ५ गावे

 

गेल्यावर्षी बिदालला हुलकावणी मिळाली. तरीही नव्या जोमाने यावर्षी चांगले काम केले. भांडवली व टाकेवाडी ही गावे राज्यपातळीवर पोहोचली. यातील एक वॉटर कपचा हक्कदार असेल.
- अजित पवार, समन्वयक पाणी फाउंडेशन, माण तालुका

Web Title: 'Mana' in water cup competition today! Attend the District's attention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.