आपत्ती प्रतिबंधासाठी सातारा पालिकेत व्यवस्थापन कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:38 AM2021-07-29T04:38:55+5:302021-07-29T04:38:55+5:30
सातारा : सातारा शहरात आपत्कालीन स्थितीत तातडीने मदत पोहोचविण्यासाठी पालिकेने आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू केला आहे. यासाठी खासदार उदयनराजे ...
सातारा : सातारा शहरात आपत्कालीन स्थितीत तातडीने मदत पोहोचविण्यासाठी पालिकेने आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू केला आहे. यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांच्या आदेशानुसार अहोरात्र चालणारी नवीन हेल्पलाईन सुरू करण्यात आल्याची माहिती उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी दिली.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, सध्या सातारा शहर व परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे दरड कोसळणे, रस्ता खचणे अथवा वाहून जाणे, वृक्ष उन्मळून पडणे, धोकादायक इमारत कोसळणे अशा आपत्कालीन घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत नागरिकांना जलद सेवा उपलब्ध करण्यासाठी पालिकेने खा. उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनानुसार ०२१६२-२३२६८६-१०१ ही नवीन हेल्पलाईन सुरू केली आहे. आपत्ती घडल्यास नागरिकांनी या हेल्पलाईनवर संपर्क साधावयाचा आहे. हेल्पलाईन चोवीस तास सुरू राहणार असल्याचे मनोज शेंडे यांनी सांगितले आहे.
फोटो : सातारा पालिका