‘लोकशाही’विरोधात ‘जनशक्ती’ एकवटली!

By admin | Published: October 30, 2016 11:24 PM2016-10-30T23:24:42+5:302016-10-30T23:24:42+5:30

कऱ्हाड पालिका निवडणूक : भाजप, सेना, एमआयएमचे पक्षीय झेंडे; उंडाळकर आघाडीची भाजपशी हातमिळवणी

'Manashakti' against 'Manashakti' assemble! | ‘लोकशाही’विरोधात ‘जनशक्ती’ एकवटली!

‘लोकशाही’विरोधात ‘जनशक्ती’ एकवटली!

Next

प्रमोद सुकरे ल्ल कऱ्हाड
कऱ्हाड पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी ‘लोकशाही’ आघाडीच्या विरोधात गत निवडणुकीत विखुरलेली ‘जनशक्ती’ आघाडी पुन्हा एकवटल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील ‘जनशक्ती’ने सर्व ठिकाणी उमेदवार दिले आहेत; पण राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीला सर्व ठिकाणी उमेदवार मिळाले नाहीत, हे विशेष. भाजप, शिवसेना, एमआयएम यांनी पक्षांचे झेंडे खांद्यावर घेतले असले तरी त्यांनाही सर्व ठिकाणी उमेदवार देणे शक्य झालेले नाही.
कऱ्हाड पालिकेची निवडणूक होत आहे. राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या कऱ्हाडच्या निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. गत निवडणुकीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण राज्याची धुरा सांभाळत असतानाही कऱ्हाडची सत्ता त्यांच्या समर्थकांना मिळवता आली नव्हती. मात्र, त्यानंतर विधानसभा निवडणुकीत याच कऱ्हाडकरांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर भरघोस प्रेम व्यक्त केले. त्याचाच परिणाम म्हणून यंदा प्रथमच पृथ्वीराजबाबांनी कऱ्हाड पालिकेच्या निवडणुकीत स्वत: लक्ष घातले असून, कऱ्हाडकर काय कौल देणार, हे पाहावे लागेल.
कऱ्हाड पालिकेत सलग चाळीस वर्षे नगराध्यक्षपद भूषविणाऱ्या दिवंगत पी. डी. पाटील यांच्या विचारांचा वारसा कऱ्हाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील, सुभाष पाटील सांभाळत आहेत. पी. डी. पाटील यांच्या पश्चातही त्यांच्या वारसदारांनी पालिकेची सत्ता अनेकदा आपल्या ताब्यात ठेवली आहे. पण यंदा त्यांना सर्व प्रभागात उमेदवार का मिळाले नाहीत, याबाबत उलट सुलट चर्चा आहे. त्यांना २२ जागांवर अधिकृत उमेदवार देता आले आहेत. दोन प्रभागात त्यांना उमेदवारच नाहीत. तर तीन प्रभागात एकच उमेदवार देता आला आहे. त्यामुळे या निवडणुकीत ‘लोकशाही’चा कस लागणार, हे निश्चित. सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, भाजपचे प्रदेश सरचिटणीस डॉ. अतुल भोसले व जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी या निवडणुकीत पक्षीय झेंडा खांद्यावर घेण्याचा निर्णय घेतला. पण नगराध्यक्षपद व इतर उमेदवार मिळून १६ ठिकाणी त्यांना उमेदवार देणं शक्य झाले आहे. मात्र, माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या कऱ्हाड शहर नागरी विकास आघाडीने भाजपशी हातमिळवणी केली असून त्यांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार न देता ११ ठिकाणी उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. तरीही त्यांचे सर्व ठिकाणी उमेदवार दिसत नाहीत.
शिवसेनेने नगराध्यक्षपदासह दहा उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. एमआयएमनेही नगराध्यक्ष पदासह दहा ठिकाणी अर्ज दाखल केले आहेत. तर मानवाधिकार पार्टीने घोषणा करूनही एकही अर्ज भरलेला नाही.
बुधवारी, दि. २ रोजी छाननी होणार आहे.
नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष रिंगणाबाहेर..!
पालिकेत सध्या लोकशाही व यशवंत विकास आघाडीची सत्ता आहे.नगराध्यक्षा संगीता देसाई व उपनगराध्यक्ष म्हणून सुभाष पाटील काम पाहत आहेत. मात्र, सध्या सुरू असणाऱ्या निवडणूक प्रक्रियेत ते दोघेही रिंगणाबाहेर आहेत. त्याची चर्चा सुरू आहे.
जनशक्ती विकास आघाडी,
नगराध्यक्षपदासाठी - अ‍ॅड. वंदना दत्तात्रय कोरडे
प्रभाग क्रमांक १ : जयश्री साने, अनिल घराळ, प्रभाग क्रमांक २ : जावेद शेख, प्रियांका यादव, प्रभाग क्रमांक ३ : गजेंद्र कांबळे, अरुणा पाटील, प्रभाग क्रमांक ४ : फिरदोश मुल्ला, अशोक, यशवंत पाटील, प्रभाग क्रमांक ५ : अस्मा खैरतखाण, सचिन गरूड, प्रभाग क्रमांक ६ : विजय वाटेगावकर, शारदा जाधव, प्रभाग क्रमांक, ७ : मिनाज पटवेकर, हणमंत पवार, प्रभाग क्रमांक ८: माया भोसले, जयवंत पाटील, प्रभाग क्रमांक ९ : दीपाली मुळे, सदाशिव यादव, प्रभाग क्रमांक १० : आरती मोहिते, राजेंद्र यादव, प्रभाग क्रमांक ११ : स्मिता हुलवान, सुनील शिंदे, प्रभाग क्रमांक १२ : शाबिरा मुलानी, पद्मिणी शिंदे, प्रभाग क्रमांक १३ : महेश कांबळे, रत्ना शेवाळे, प्रभाग क्रमांक १४ : अमिर हुसेन मुल्ला, सुप्रिया खराडे, कल्पना जाधव.
भारतीय जनता पक्ष
नगराध्यक्षपदासाठी - रोहिणी उमेश शिंदे. प्रभाग, क्रमांक १ : समीर करमरकर, अनघा कुलकर्णी, प्रभाग क्रमांक २ : रमेश मोहिते, विनायक पावसकर, प्रभाग क्रमांक ४ : दीपक पाटील, शीतल कुंभार, प्रभाग क्रमांक ५ : विद्या पावसकर, सुहास जगताप, प्रभाग क्रमांक ६ : विक्रम पावसकर, शीतल निकम, प्रभाग क्रमांक, १३ : राहुल भिसे, गजाला सय्यद, प्रभाग क्रमांक, १४ : अजय पावसकर, राजश्री कारंडे, नम्रता कदम.
लोकशाही आघाडी
नगराध्यक्षपदासाठी - लीना सिद्धार्थ थोरवडे
प्रभाग क्रमांक १ : अनिता पवार, सौरभ पाटील, प्रभाग क्रमांक २ : महंमद चाँद बागबान, अरुणा जाधव, प्रभाग क्रमांक ३ : राजेंद्र कांबळे, सारिका पाटील, प्रभाग क्रमांक ४ : आशा पाटसकर, जयवंत पाटील, प्रभाग क्रमांक ५ : शैलजा फल्ले, अमृत देशपांडे, प्रभाग क्रमांक ७ : हसिना वाईकर, प्रताप साळुंखे, प्रभाग क्रमांक ८: सागर बर्गे, प्रभाग क्रमांक ११ : राकेश शहा, प्रभाग क्रमांक १२ : वैभव हिंगमीर, पल्लवी पवार, प्रभाग क्रमांक १३ : जयप्रकाश रसाळ, रजिया आंबेकरी, प्रभाग क्रमांक १४ : मोहसीन आंबेकरी, मंदा खराडे, सुनंदा शिंदे.
भाजपमध्येही धुसफूस...
भारतीय जनता पक्षाने पक्षीय पातळीवर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला खरा; पण त्यांच्यातही धुसफूस पाहायला मिळाली. त्यामुळेच भाजपचे कार्यकर्ते डॉ. गिरीश देशपांडे यांनी ऐनवेळी शिवसेनेचा एबी फॉर्म घेतला. प्रदेश युवा मोर्चाचे सरचिटणीस सुदर्शन पाटसकर यांच्या मातोश्रींनी लोकशाही आघाडीतून, डॉ. अतुल भोसले समर्थक विद्यमान नगरसेवक महादेव पवार यांच्या पत्नी सारिका पवार यांनी कऱ्हाड शहर नागरी विकास आघाडीतून अर्ज दाखल केला.
 

Web Title: 'Manashakti' against 'Manashakti' assemble!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.