माणदेशी फाउंडेशनचा माणदेशी ऑक्सिजन बँक उपक्रम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:42 AM2021-05-21T04:42:13+5:302021-05-21T04:42:13+5:30

म्हसवड : सध्याची राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहून कोविड रुग्णांना ऑक्सिजनची गरज असल्यामुळे दरवेळीप्रमाणे माणदेशी फाउंडेशन ऑक्सिजन बँकेची अनोखी ...

Mandeshi Foundation's Mandeshi Oxygen Bank Initiative! | माणदेशी फाउंडेशनचा माणदेशी ऑक्सिजन बँक उपक्रम !

माणदेशी फाउंडेशनचा माणदेशी ऑक्सिजन बँक उपक्रम !

Next

म्हसवड : सध्याची राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहून कोविड रुग्णांना ऑक्सिजनची गरज असल्यामुळे दरवेळीप्रमाणे माणदेशी फाउंडेशन ऑक्सिजन बँकेची अनोखी कल्पना साकारत आहे.

या सर्व कोरोनाच्या काळामध्ये माणदेशी फाउंडेशनने कोरोना रुग्णांसाठी जे काही करता येईल ते सर्व केले आहे. माण तालुक्यामध्ये पहिले कोविड हॉस्पिटल गोंदवले येथे उभे केले. सातारा येथील जम्बो हॉस्पिटलला व्हेंटिलेटर दिले. तसेच सातारा जिल्हाधिकाऱ्यांना पीपीई कीट दिले. ग्रामीण भागात घरोघरी जाऊन मास्क वाटप केले. माण तालुक्यामधील कोविड रुग्णांना पौष्टिक आहार भेटावा यासाठी मोफत दोन वेळचे जेवण वाटप करण्यात येत आहे.

हे सर्व करीत असताना माणदेशी फाउंडेशन आता सर्वांसाठी ऑक्सिजन बँक चालू करीत आहे. ज्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे, अशा प्रत्येक रुग्णाला ऑक्सिजन काॅन्सेंट्रेटर सात दिवसांसाठी मोफत देण्यात येणार आहे, अशी माहिती माणदेशी चॅम्पियनचे अध्यक्ष प्रभात सिन्हा यांनी दिली.

Web Title: Mandeshi Foundation's Mandeshi Oxygen Bank Initiative!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.