गोंदवले ग्रामपंचायतीवर माने गटाचेच वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:39 AM2021-01-20T04:39:13+5:302021-01-20T04:39:13+5:30

म्हसवड माण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोंदवले बुद्रुक ग्रामपंचायतीवर नऊ जागेवर आघाडी घेऊन पुन्हा माने गटाला आपला झेंडा ...

Mane group dominates Gondwale gram panchayat | गोंदवले ग्रामपंचायतीवर माने गटाचेच वर्चस्व

गोंदवले ग्रामपंचायतीवर माने गटाचेच वर्चस्व

Next

म्हसवड

माण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोंदवले बुद्रुक ग्रामपंचायतीवर नऊ जागेवर आघाडी घेऊन पुन्हा माने गटाला आपला झेंडा कायम ठेवण्यात यश मिळाले. आमदार जयकुमार गोरे गटाला पाच जागेवर समाधान मानावे लागले. तर अटीतटीच्या लढतीत एका अपक्षाने बाजी मारली.

माण तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाची असलेल्या गोंदवले बुद्रुक ग्रामपंचायतीच्या पंधरा जागांसाठी निवडणूक झाली. निवडणुकीच्या सुरुवातीला वाजू पाहणारी बिनविरोधची पुंगी प्रत्यक्ष निवडणुकीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर मात्र वाजलीच नाही. परिणामी, निवडणूक लागलीच.

या ग्रामपंचायतीवर अनेक वर्षांपासून बाळासाहेब माने गटाचे वर्चस्व राहिले आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीवेळी आमदार जयकुमार गोरे हे माने गटासोबत होते; परंतु गोरेंच्या भाजप प्रवेशाने माने गट विभागला गेला; परंतु माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख सोबत राहिल्याने माने गटाची ताकद पुन्हा एकवटली. या निवडणुकीत आमदार गोरे गटाची एकाकी पडल्यासारखी अवस्था झाली. याच दरम्यान, माने गटासोबत कायम असणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी नाराजीतून आमदार गटाला पाठिंबा दिला. त्यामुळे या लढतीत चुरस निर्माण झाली होती. माने गटाने श्रीराम पॅनेलच्या तर आमदार गटाने परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली. या अटीतटीच्या लढतीत नऊ जागा निवडून आल्याने माने गटाला निर्विवाद यश मिळाले. तर आमदार गटाला मात्र पाच जागांवरच समाधान मानावे लागले. हनुमान वार्डात अपक्ष उमेदवार राजेंद्र सदाशिव अवघडे निवडून आले.

चौकट

या निवडणुकीतील विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते. लक्ष्मी वार्ड-प्रवीण (दत्ता) सयाजी कट्टे (५६६),मीनाक्षी राजेंद्र कचरे (५३१),उज्वला संदीप फडतरे (५५९) श्रीराम वार्ड-संजय दादा माने (४१५),गुरुदेवदत्त प्रकाश कुलकर्णी (५१०), अश्विनी अंगराज कट्टे (४८३) श्रीनाथ वार्ड-पंकज सयाजीराव पाटील (४९६),सविता चांगदेव चव्हाण (४४७),मालती पोपट माने (४११) हनुमान वार्ड-राजेंद्र सदाशिव अवघडे (३२८), शोभा बाळकृष्ण सोनवणे (५१०), अनिता तानाजी रणपिसे (४७०) विठ्ठल वार्ड-तानाजी मस्कू शिंगाडे (५२६), जयप्रकाश शिवाजी कट्टे (५८२), उषाताई आबासो फडतरे (५२७).

Web Title: Mane group dominates Gondwale gram panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.