माणगंगेतील बंधारे भरून वाहिले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 01:50 PM2017-09-17T13:50:50+5:302017-09-17T13:53:48+5:30

जूनच्या सुरुवातीला माणमध्ये थोड्या प्रमाणात पाऊस झाला होता. त्या ओलीवर शेतकºयांनी खरीप हंगामात बाजरी, मका, कांदा व अन्य पिके घेतली होती.  मात्र, ही सर्व पिके पाण्यावाचून करपल्याने बळीराजा चिंतातूर झाला होता. पण मागील काही दिवसांपासून गोंदवले, दहिवडीसह परिसरात झालेल्या पावसाने माणगंगेतील बंधारे भरू लागल्याने बळीराजाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

Mangaung bunds filled! | माणगंगेतील बंधारे भरून वाहिले !

माणगंगेतील बंधारे भरून वाहिले !

Next
ठळक मुद्देपळशीतील स्थिती दुष्काळी भागातील बळीराजाच्या आशा पल्लवीत जलयुक्तची किमया!रब्बी हंगामाला दिलासा.

दहिवडीदि. 17‌ : जूनच्या सुरुवातीला माणमध्ये थोड्या प्रमाणात पाऊस झाला होता. त्या ओलीवर शेतकºयांनी खरीप हंगामात बाजरी, मका, कांदा व अन्य पिके घेतली होती.  मात्र, ही सर्व पिके पाण्यावाचून करपल्याने बळीराजा चिंतातूर झाला होता. पण मागील काही दिवसांपासून गोंदवले, दहिवडीसह परिसरात झालेल्या पावसाने माणगंगेतील बंधारे भरू लागल्याने बळीराजाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.


 माण तालुक्यातील पळशी परिसरात पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे खरीप  हंगाम वाया गेला. असे असलेतरी सध्या तालुक्याच्या पश्चिम भागात समाधानकारक पाऊस होत आहे. त्यामुळे माणगंगा नदीवरील बंधारे भरून वाहू लागल्याने बळीराजा सुखावला आहे. सध्या गोंदवले, लोधवडे, मनकर्णवाडी, पळशी, जाशी या गावातील सिंमेट बंधारे पाण्याने भरु लागले आहेत. यामुळे बळीराजा सुखावला असलातरी दमदार पावसाची प्रतीक्षा आहेच. 


पश्चिम भागात दमदार पाऊस झाल्याने व लोधवडे ओढ्याला पाणी वाहू लागल्याने पळशी परिसरातील बंधारे पाण्याने भरून वाहू लागल्याने शेतकºयांना रब्बी हंगामासाठी फायदा होऊ शकतो. मात्र, माणचा पूर्व भागात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. त्या परिसरात नुसतीच रिपरिप सुरू आहे.


रब्बी हंगामाला दिलासा...

माणगंगा नदीवर गेल्या दोन वर्षांपूर्वी जलयुक्त शिवारमधून झालेल्या साखळी बंधाºयांमध्ये पाणी आले आहे. हे  बंधारे पाण्याने भरून वाहू लागले आहेत. शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबर रब्बी हंगामाला याचा फायदा होणार आहे. 

जलयुक्तची किमया !

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या संकल्पनेतून व भाजपचे सरचिटणीस डॉ. राजेंद्र खाडे यांच्या प्रयत्नांमुळे जलयुक्त शिवारमधून पळशीमध्ये माणगंगा नदीवर पाच सिंमेट बंधारे साखळी पध्दतीने बांधले आहेत. त्यामुळे सध्या सात किलो मीटरपर्यंत पाणी साचले आहे. मनकर्णवाडी, जाशी, पळशी आदी गावांना याचा मोठा फायदा होणार आहे

Web Title: Mangaung bunds filled!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.