'मांघर' ठरणार देशातील पहिलं 'मधाचं गाव', घरोघरी घेतलं जातं मधाचे उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 12:05 PM2022-02-28T12:05:45+5:302022-02-28T12:24:21+5:30

पुस्तकाचे गाव म्हणून महाबळेश्वर तालुक्यातील भिलार या गावाला मान मिळाला. तसाच मान आता देशातील पहिले मधाचे गाव म्हणुन लवकरच जाहीर केला जाणार आहे

Manghar in Mahabaleshwar taluka will be the first Honey village in the country, honey is produced at home | 'मांघर' ठरणार देशातील पहिलं 'मधाचं गाव', घरोघरी घेतलं जातं मधाचे उत्पादन

'मांघर' ठरणार देशातील पहिलं 'मधाचं गाव', घरोघरी घेतलं जातं मधाचे उत्पादन

googlenewsNext

महाबळेश्वर: देशातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून महाबळेश्वर तालुक्यातील भिलार या गावाला मान मिळाला. तसाच मान आता देशातील पहीले मधाचे गाव म्हणुन याच तालुक्यातील मांघर या गावाचे नाव लवकरच जाहीर केला जाणार आहे. त्याची पूर्व तयारी म्हणुन सातारा जिल्हाधिकारी यांनी आज मांघर या गावाला भेट देवुन तेथील मध उदयोगाची पाहणी केली.

ग्रामस्थ व मधपाळांशी देखिल जिल्हाधिकारी यांनी  संवाद साधून अधिक माहिती घेतली. महाबळेश्वर तालुक्यातील मांघर हे गाव आदर्श गाव आहे. स्मार्ट विलेज असलेल्या मांघर या गावाने निमर्लग्राम पुरस्कार, तंटामुक्त गाव पुरस्कार, संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान पुरस्कार, पयार्वरण विकास रत्न पुरस्कार, एक गाव एक गणपती पुरस्कार व लोकग्राम पुरस्कार असे अनेक पुरस्कार पटकाविले आहेत. आता या गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.

या पाश्वर्भुमीवर सातारा जिल्हाधिकारी शेखरसिह यांनी मांघर गावाला भेट देवुन तेथील मध उत्पादनाची माहीती घेतली मांघर गावाला भेट देण्यापूर्वी सातारा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली हिरडा विश्राम गृहावर एक महत्वाची बैठक पार पडली.      

घरटी मधाचे उत्पादन    
             
मधाचे गाव म्हणुन मांघर हेच गाव का या बाबत खादी ग्रामोदयोगचे संचालक वसंत पाटील यांनी सविस्तर माहीती दिली. या गावात घरटी मधाचे उत्पादन घेतले जाते. प्रत्येक घरात मधपाळ आहेत जिल्हयातील एकुन मधाच्या उत्पादना पैकी दहा टक्के उत्पादन या गावात होते. असे सांगुन या गावात कोणकोणते प्रकल्प राबविले जातील या बाबतचा आराखडा पाटील यांनी सादर केला.

हिरडा येथील बैठकी नंतर जिल्हाधिकारी यांनी थेट मांघर गावाला भेट दिली. या गावातील नाॅथर्कोट या पाॅइंर्टची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी राजेंद्र चोरगे या मधपाळाच्या घरी भेट देवुन मधपाळांशी संवाद साधला. या ठिकाणी त्यांनी मध पेटया व त्या पासून घेतले जाणारे मधाचे उत्पादन याची माहीती घेतली. अविृष्टीमुळे मधपेटयांचे नुकसान झाल्याची माहीती या गावातील मधपाळांनी जिल्हाधिकारी यांना दिली.

यावेळी उपवनसंरक्षक महादेव मोहिते, तहसिलदार सुषमा चौधरी-पाटील, वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी, गट विकास अधिकारी अरूण मरभळ, खादी ग्रामोदयोगचे संचालक वसंत पाटील व विस्तार अधिकारी सुनिल पारठे आदी मान्यवर उपस्थित होते.

दृष्टिक्षेपात...

  • मांघर गावातील मध विक्रेत्याची एकूण संख्या : ८८
  • गावातील एकूण मधाचे वार्षिक उत्पन्न : चार हजार किलो
  • मधाच्या जाती : गेळा, हिरडा, अंजन, कारवी, व्हॉयटी
  • गावात एकूण मध पेट्या : १८५०
  • मधुसागर सहकारी संस्था व खादीग्राम उद्योग

Web Title: Manghar in Mahabaleshwar taluka will be the first Honey village in the country, honey is produced at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.