पाचगणीतील स्वच्छतेचा मंगोलीयन गरुडांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 11:28 PM2018-02-14T23:28:10+5:302018-02-14T23:41:43+5:30
सचिन काकडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : केवळ पाचगणीत दृष्टीस पडणाºया मंगोलियातील स्थलांतरित स्टेपी गरुडांची संख्या यंदा झपाट्यानं कमी झाली आहे. स्वच्छता अभियानात सहभागी झालेल्या पाचगणी पालिकेने कचरा डेपोचे सपाटीकरण केले. स्वच्छतेच्या दृष्टीने ही बाब कौतुकास्पद असली तरी विदेशी गरुडांना मिळणारे खाद्य मातीखाली गाडले जात आहे. परिणामी खाद्याची कमतरता जाणवू लागल्याने या दुर्मीळ पक्ष्यांनी यंदा पाचगणीकडे पूर्णपणे पाठ फिरविली आहे.
हिवाळ्यात मंगोलियात बर्फवृष्टी सुरू झाल्यास या गरुडांना मिळणारे खाद्य बर्फाखाली गाडले जाते. त्यामुळे हे गरूड खाद्याच्या शोधार्थ चार ते पाच महिने अन्यत्र स्थलांतर करतात. भारतात काही ठिकाणी हे गरूड आढळून आले असले तरी सातारा जिल्ह्यात केवळ पाचगणीतच गेल्या पंधरा वर्षांपासून हे गरूड नजरेस पडत आहेत. त्याला कारणही तसेच आहे.
पाचगणीतील कचरा डेपोत मोठ्या प्रमाणात शहरातील कचरा गोळा करून टाकला जातो. असंख्य हॉटेल्समुळे या कचºयात मांसाच्या तुकड्याचे प्रमाणही अधिक असते. मांसाचे तुकडे, साप अन् उंदीर हे गरुडांचे मुख्य खाद्य असल्याने कचरा डेपोत गरुडांची संख्या शेकडोंच्या घरात होती. पूर्वी तीनशे ते चारशे पक्ष्यांचा थवा या ठिकाणी नजरेस पडत असे. मात्र, यंदा अत्यंत कमी आहे. आता पाच ते दहा
गरूडच पाहावयास मिळतात. खाद्याच्या शोधार्थ हजारो मैल प्रवास करून सातारा जिल्ह्यात विसावा घेणाºया या पक्ष्यांना आता खाद्याअभावी आपले विसाव्याचे क्षेत्रच बदलावे लागत आहे.
गरुड असो की इतर पक्षी यांची नैसर्गिक अन्नसाखळी खंडित झाल्यास ते आपल्या अधिवासाचे क्षेत्र बदलतात. पाचगणीत येणाºया स्टेपी गरुडांच्या बाबतीततही असेच काहीसे घडले आहे. शहराचा विकास साधत असताना या विदेशी पक्ष्यांचे अस्तित्वही टिकायला हवे, यासाठी उपाययोजनेची मागणी होत आहे.
ंही आहेत वैशिष्ट्य
भारतात आढळणाºया गरुडांपेक्षा मंगोलियातील गरूड हा आकारमानाने, वजनाने अन् रंगाने भिन्न असा आहे.
या गरुडास इंग्रजीत स्टेपी गरूड तर मराठीत नेपाळी गरूड या नावाने
ओळखले जाते.
याची उंची दीड ते पावणे दोन फूट इतकी असते.
वजन सुमारे दहा ते बारा किलो असते.
या गरुडाच्या पंखांची लांबी सुमारे
५ ते ६ फूट इतकी असते.
डोकं चपटं, चोच लांबडी अन् बागदार असते.
याच्या पायावर केस असतात. याची संपूर्ण ताकद ही त्याच्या पायांमध्येच असते.
भारतात आढळणारे गरूड स्टेपी (नेपाळी) गरुडाच्या तुलनेत आकाराने लहान व वजनाने कमी असतात.
यांच्या पंखाची लांबीही कमी असते.