माणला वाऱ्यासह पावसाने झोडपले

By admin | Published: May 26, 2017 10:55 PM2017-05-26T22:55:40+5:302017-05-26T22:55:40+5:30

माणला वाऱ्यासह पावसाने झोडपले

Manna got upset with the wind | माणला वाऱ्यासह पावसाने झोडपले

माणला वाऱ्यासह पावसाने झोडपले

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
म्हसवड : दुष्काळी माण तालुक्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास झोडपून काढले. यामध्ये अनेकांच्या घरांवरील पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले. तसेच गोंदवले खुर्दमध्ये घराची भिंत अंगावर पडल्याने एका गायीचा मृत्यू झाला.
दहिवडी, गोंदवले खुर्द, गोंदवले बुद्रुक, पिंगळी, जाशी, पळशी परिसराला वादळी वाऱ्यासह वळवाच्या पावसाचा तडाका बसल्याने अनेक घरांची पडझड झाली. घरांवरील पत्रे उडून गेले. गोंदवले खुर्द येथे सुनील शिलवंत यांच्या घराच्या भिंतीजवळ बांधलेल्या गाईच्या अंगावर घराची भिंत पडल्याने गाईचा मृत्यू झाला.
काही गावांमध्ये या उन्हाळ्यात झालेल्या जलसंधारणाच्या कामांमध्ये पाणीसाठा झाला आहे. वादळामुळे घरांचे पत्रे उडून गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून कडक उन्हामुळे लाहीलाही झालेल्या माणवासीयांना शुक्रवारच्या पावसाने थोडासा दिलासा दिला असला तरी माण तालुक्याच्या बहुतांशी भागाला पावसाने हुलकावणी दिली.
औंध : औंधसह वरुड, सिद्धेश्वर कुरोली, नागाचे कुमठे गावास वळवाच्या पावसाने शुक्रवारी चांगलेच झोडपले. औंधमध्ये झाड विद्युत खांबावर पडल्याने विद्युतपुरवठा खंडित झाला होता.
वादळी वाऱ्याचा वेग जास्त असल्याने काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. कुमठे येथे पाणी फाउंडेशनच्या वतीने खोलीकरण केलेल्या ओढ्यात समतल चरी भरल्या असून, पावसामुळे भरून वाहत होते. वरुड, सिद्धेश्वर कुरोली येथे रस्त्याच्या दुतर्फा नाल्यातून पाणी वाहत होते. औंध, नांदोशी, त्रिमली, वडी, गोपुज, वाकळवाडी गावांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

Web Title: Manna got upset with the wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.