मानाच्या गणपतींनी दिले सातारकरांना दर्शन

By admin | Published: September 4, 2016 11:47 PM2016-09-04T23:47:07+5:302016-09-04T23:47:07+5:30

शाहूनगरी सजली : हरळी, विद्युत रोषणाई अन् मोदकांना मागणी वाढली

Manna's Ganapati gave Darshan to Satarkar | मानाच्या गणपतींनी दिले सातारकरांना दर्शन

मानाच्या गणपतींनी दिले सातारकरांना दर्शन

Next

सातारा : अकरा दिवसांच्या मुक्कामासाठी येणाऱ्या गणरायांच्या स्वागतासाठी साताऱ्यातील बाजारपेठ फुलली आहे. शहरातील जुना व मानाचा गणपती म्हणून ओळखला जात असलेल्या सम्राटच्या महागणपतीचे रविवारी थाटात स्वागत केले. चांदीची आभूषणे परिधान केलेली बाप्पाची मूर्ती वाजत-गाजत मंडपात आणली.
गणेशाचे आगमन सोमवार, दि. ५ रोजी होत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची मूर्ती रविवारी दिवसभर ट्रॅक्टरमधून नेली जात होती. घरगुती पूजेसाठी गणेशमूर्तीची नोंदणी केली जात होती. या मूर्ती सोमवारी सकाळी घरोघरी नेल्या जाणार आहेत. गणेशाचे सोमवारी आगमन होणार असले तरी तरुणाईला सजावटीचे वेध आगले आहेत. शाळा-महाविद्यालय व कार्यालयांना रविवारी सुटी असल्याने चांगली खरेदी करता आली. बाजारपेठेत दिवसभर गर्दी दिसून येत होती. पूजेसाठी आवश्यक असणारे हरळी, आघाडा, फुले विक्रेत्यांनी मोती चौकीत गर्दी केली होती. (प्रतिनिधी)
आधुनिक पडद्यांचे
खास आकर्षण
गौरी-गणपतींना पडदे टाकून आकर्षक सजावट केली जाते. यामध्ये काही ठिकाणी प्लास्टिक पाईपचा वापर करून रेडिमेड पडदे विक्रीस आले आहेत. आकर्षक रंगछटामुळे त्यांना चांगली मागणी आहे.
सुवासिनींनी धरला हरतालिकेचा उपवास
गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालिकेचा उपवास केला जातो. सातारा शहरासह जिल्ह्यातील महिलांनीही हरतालिकेची पूजा करून उपवास धरला. शहरात नदीकाठची वाळू सहजासहजी उपलब्ध होत नसल्याने राजवाडा परिसरात छोट्या-छोट्या मूर्ती विक्रीस आल्या होत्या.
गणपती बाप्पा रवाना
जिल्ह्यातील अनेक मोठ्या गावांतील गणेशमूर्ती रविवारी साताऱ्यातून नेण्यात आल्या. त्या-त्या गावातून आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी ‘गणपती बाप्पा मोरया....’चा जयघोष करत ट्रॅक्टर ट्रॉलीमधून गणेशमूर्ती गावी नेले.

Web Title: Manna's Ganapati gave Darshan to Satarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.