चित्रपटातील कामाचं स्वप्न भंगल्यानं बनला मनोरुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 07:53 PM2019-05-19T19:53:00+5:302019-05-19T19:53:05+5:30

दत्ता यादव । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : चित्रपटात काम करण्यासाठी अनेक तरुण प्रयत्न करत असतात. मात्र, यात सगळ्यांनाच ...

Manoragin became a dream of breaking the dream of the film | चित्रपटातील कामाचं स्वप्न भंगल्यानं बनला मनोरुग्ण

चित्रपटातील कामाचं स्वप्न भंगल्यानं बनला मनोरुग्ण

googlenewsNext


दत्ता यादव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : चित्रपटात काम करण्यासाठी अनेक तरुण प्रयत्न करत असतात. मात्र, यात सगळ्यांनाच यश येईल, हे निश्चित नसलं तरीसुद्धा अनेक युवक चित्रपटात काम करण्यासाठी संपूर्ण आयुष्यच झोकून देतात. मात्र, यात यश मिळाले नाही तर अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचे आपण पाहत असतो. असाच काहीसा प्रकार सातारा तालुक्यातील एका गावात घडला असून, एका युवकाचं चित्रपटात काम करण्याचं स्वप्न भंगल्यानं तो मनोरुग्ण झाल्याचं समोर आलं.
सातारा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ३५ वर्षीय अजयला (बदललेले नाव) शालेय जीवनापासूनच चित्रपटाचं प्रचंड आर्कषण होतं. अ‍ॅक्टिंग हे त्याच्या रक्तातच होतं. गावच्या पारावर नकला तर कधी अभिनय तो करत होता. निळू फुले यांचा तो जबरी फॅन होता. त्यांच्यासारख्या अभिनयाचा ध्यास त्याने घेतला होता. चित्रपटात काम करून आपण एक दिवस मोठे स्टार होणार, यासाठी तो प्रचंड मेहनत घेत होता. अनेक चित्रपटाच्या त्याने आॅडीशन्सही दिल्या. मात्र, अपयश जणू हात जोडून त्याच्या समोर उभं असायचं. त्यामुळे तो सतत तणावाखाली राहायचा. वडिलांच्या व्यसनाचेही टेन्शन असल्यामुळे त्याने चक्क घरातून बाहेर पडणं सोडून दिलं. वडील व्यसनी होते. मात्र, मोलमजुरी करून किमान मुलांना जगवत होते. अशातच एक दिवस वडिलांचा अपघात झाला. वडील कायमचे सोडून गेले. त्याचा धक्का त्याच्या आईला आणि दुसºया लहान भावालाही बसला. अगदी हलाखीची परिस्थिती झाली. अजयचे हळूहळू मानसिक संतुलन ढासळले. तो मनोरुग्ण म्हणूनच गावात वावरू लागला. चित्रपटात काम करण्याचं स्वप्न उराशी बाळगलेला अजय स्वत:च्या विश्वात रमून गेला. त्याची ही परिस्थिती पाहून गावकऱ्यांची मनेही हेलावून गेली. गावकºयांनी सामाजिक कार्यकर्ते रवी बोडके यांना याची माहिती दिली. त्यानंतर रवी बोडके यांनी गावात जाऊन अजयवर उपचार करण्याचा निर्णय घेतला. त्याला रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले. त्याला या आजारातून बरे करून त्याचे आयुष्य त्याला परत मिळावे, यासाठी रवी बोडके यांनी चंग बांधला आहे. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्या अजयविषयी सर्व गावकºयांना सहानुभूती आहे. तो यातून लवकर बरा व्हावा, यासाठी गावकºयांचेही प्रयत्न सुरू आहेत.

कुटुंबातील तिघांवर एकाचवेळी उपचार सुरू
अजय आणि त्याच्या आई, भावाचे मानसिक संतूलन बिघडल्याने गावकरी चिंताग्रस्त झाले. अजयसह त्याच्या कुटुंबावर योग्य उपचार व्हावेत, यासाठी गावकºयांनी पुढाकार घेतला. सातारा तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन अजयवर उपचारासाठी प्रयत्न करण्याची मागणी गावकºयांनी केली. अखेर पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ते रवी बोडके यांना बोलावून घेऊन त्यांना हा प्रकार सांगितला. त्यांनीही अजयवर तत्काळ उपचार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

Web Title: Manoragin became a dream of breaking the dream of the film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.