जलसंधारणामुळे अनेक गावे पाणीदार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 11:24 PM2017-09-25T23:24:09+5:302017-09-25T23:24:13+5:30

Many villages are water cleansed! | जलसंधारणामुळे अनेक गावे पाणीदार!

जलसंधारणामुळे अनेक गावे पाणीदार!

Next



नवनाथ जगदाळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
दहिवडी : माण तालुक्यातील अनेक ठिकाणी यावर्षी पावसाने वार्षिक सरासरी ओंलडली असून, जलसंधारणाची कामे झाल्याने काही गावे पाणीदार झाली आहेत. असे असलेतरी कुकुडवाड मंडलात मात्र, भीषण स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण, या मंडलात अत्यल्प पाऊस झाला आहे.
माण तालुक्यातील सात मंडलांपैकी मलवडी मंडलात सर्वाधिक ४८१ मिलीमीटर पाऊस झाला आहे. गोंदवले ३९४ मिलीमीटर तसेच दहिवडी मंडलामध्ये ४६७ मिलीमीटर पाऊस झाला आहे. या तिन्हीही मंडलांत पावसाने सरासरी ओलांडली असून, त्या खालोखाल मार्डी ३४४, म्हसवड मंडलात ३४२ मिलीमीटर पाऊस पडला आहे. शिंगणापूर १५१ तर कुकडवाडमध्ये अवघा ३५ मिलीमीटर पाऊस पडला आहे.
यावर्षी पावसाने सुरुवातीला दडी मारली होती. परंतु या पितृपंधरवड्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याने तालुक्यातील अनेक गावातील ओढे, नाले, पाझर तलाव, सिमेंट बंधारे वाहू लागले आहेत. तालुक्यात जलसंधारणाचे काम मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्यात अनेक गावे यशस्वी झाली आहेत. आज तालुक्यातील बहुतांशी गावे पाणीदार झाली आहेत, असे असले तरी तालुक्यातील प्रमुख तलावापैकी तुपेवाडी, लोधवडे तलाव १०० टक्के भरला आहे.
ढाकणी तलाव ४२ टक्के भरला आहे. बिदाल, दहिवडी, गोंदवलेचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविणाºया आंधळी तलावात ६५.३३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला असून, उर्वरित तलावात अद्यापही मृतसाठा आहे. पाण्याची आवक सुरू असून, एखादा मोठा पाऊस झाल्यास हे सर्व तलाव भरतील, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणीप्रश्न मिटणार आहे, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
भूगर्भातील पाणीपातळीत वाढ...
माण तालुक्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे. परंतु काही गावांत माथा ते पायथा असे जलसंधारणाचे काम झाल्याने मुख्य तलावात लवकर पाणी आले नाही, ही वस्तूस्थिती आहे. असे असले तरी भूगर्भातील पाणी पातळीत वाढ झाली आहे.

Web Title: Many villages are water cleansed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.