ठिय्या आंदोलनात ‘भारुड, भजन अन् कीर्तन’ फलटणमध्ये मराठा बांधव एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 11:41 PM2018-07-27T23:41:31+5:302018-07-27T23:41:49+5:30

Maratha brothers together in Phulatan 'Bharud, Bhajan and Kirtan' together with thiya agitation | ठिय्या आंदोलनात ‘भारुड, भजन अन् कीर्तन’ फलटणमध्ये मराठा बांधव एकत्र

ठिय्या आंदोलनात ‘भारुड, भजन अन् कीर्तन’ फलटणमध्ये मराठा बांधव एकत्र

Next
ठळक मुद्दे: शिस्तप्रिय ठिय्या ; मागणीसाठी शेतकरी, विविध पक्षांतील नेत्यांची उपस्थिती

मलटण : मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू आहेत. सुरुवातीला अतिशय शांत आणि संयमी मोर्चे काढणारा मराठा समाज आता आरपारच्या लढाईसाठी सज्ज झाला आहे. काही ठिकाणी तो आक्रमकही झाला आहे. यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी या तरुणांची आहे. त्याचाच प्रत्यय फलटण येथे मराठा बांधवांनी रात्र जागून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

फलटण येथील ठिय्या आंदोलन करून सरकारची झोप उडवणाऱ्या आंदोलकांनाही झोप नाही. ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग,’ या तुकारामाच्या ओवीप्रमाणे आरक्षण मिळावे, या एकाच मागणी आहे. या मागणीसाठी सर्व फलटण शांत झोपले असताना तहसील कार्यालयाच्या समोरील रस्त्यावर हे तरुण अंधाºया ढगाळ रात्री बोचºया थंडीत ठामपणे बसले आहेत. काहीही झाले तरी मागे हटणार नाही, असा इशाराच देताना ते दिसतात. अतिशय नियोजन बद्ध आणि शिस्तप्रिय आंदोलनाची आखणी या युवकांनी केलेली दिसते.

सर्वांचा सहभाग नोंदवला जावा, या उद्देशाने या आंदोलनात सर्व गावांचा समावेश एक वेळापत्रक तयार करून आंदोलनाचा फलटण तालुक्यातील विस्तार वाढविला आहे. प्रत्येक गावातील तरुणांना या आंदोलनात काही गावांना यात सहभागी करून घेतले जाणार आहे.
दिवसन्रात्र ठिय्या देऊन उत्स्फूर्त सहभाग नोंदवणाºया मराठा बांधवांनी फलटणमध्ये तरी संयम पाळला आहे. पण लवकर काही निर्णय न झाल्यास आंदोलकांच्या भावनांचा बांध केव्हाही फुटू शकतो. समाजातील सामान्य शेतकरी ते विविध पक्षांतील कार्यकर्ते यांच्याबरोबर पक्षीय नेते रात्रीही उपस्थित आहेत. मराठा समाजाच्या विविध संघटना एकत्रित आल्या आहेत. ठिय्या आंदोलनात जेवणाची व्यवस्था करण्यात आले आहे.

हक्काचा लढा पोहोचविण्यात यशस्वी..
रात्रभर जागून आपल्या हक्काची लढाई लढताना आंदोलक पुढची रणनीती ठरवत होते. आंदोलन करत असताना सामान्य नागरिकांना याचा कोणताही त्रास होऊ नये, अशी भूमिका मराठा समाजबांधवांची आहे. यावेळी मराठा बांधवांनी भजन, कीर्तन केले. यामुळे रात्र कशी निघून गेली, हे समजलेच नाही. भारुडाच्या माध्यमातून समाजापर्यंत आपल्या हक्काचा लढा पोहोचवण्यात मराठा बांधव यशस्वी झाले आहे.
सर्व संघटना एकत्र

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. या हक्कासाठी फलटण तालुक्यातील सर्व संघटना एकत्र आल्या आहेत. त्यामध्ये सकल मराठा समाज, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ आदींचा समावेश आहे.

Web Title: Maratha brothers together in Phulatan 'Bharud, Bhajan and Kirtan' together with thiya agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.