Maratha Kranti Morcha : फलटण तहसीलवर ठिय्या आंदोलन, हजारो समाजबांधव सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 02:17 PM2018-07-26T14:17:04+5:302018-07-26T14:18:49+5:30
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यशासन ठोस भूमिका घेत नाही. त्यांनी निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी फलटण तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवार, दि. २६ रोजी बळीराजाचे पूजन करून प्रांताधिकारी तसेच तहसील कार्यालयाबाहेर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले. यामध्ये हजारो समाजबांधव सहभाागी झाले. यात महिलांची संख्याही जास्त आहे.
फलटण (सातारा) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यशासन ठोस भूमिका घेत नाही. त्यांनी निर्णायक भूमिका घ्यावी, या मागणीसाठी फलटण तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवार, दि. २६ रोजी बळीराजाचे पूजन करून प्रांताधिकारी तसेच तहसील कार्यालयाबाहेर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले. यामध्ये हजारो समाजबांधव सहभाागी झाले. यात महिलांची संख्याही जास्त आहे.
मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर शांततेच्या मार्गाने मोर्चे काढले. मुंबई येथेही निर्णायक मोर्चा काढला. मात्र राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत गंभीर नसल्याचे दिसून आले. त्यांची वक्तव्ये दिशाभूल करणारी दिसत असून, विधिमंडळातही अनेक आमदार आणि राजकीय पक्षांनी मराठा आरक्षणाबाबत मागणी केली. राज्यात अनेक ठिकाणी पुन्हा आरक्षणासाठी आंदोलने सुरू झाली असून, फलटणलाही आता निर्णायक आंदोलन सुरू करण्यात आले.
राज्य सरकार जोपर्यंत ठोस निर्णय जाहीर करत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. हे आंदोलन शांततेत करण्यात येणार असल्याचे संयोजकांच्या वतीने जाहीर करण्यात आले. मराठा आंदोलनासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या काकासाहेब शिंदे यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
आरक्षणासाठी राजीनामा देणारे आमदार हर्षवर्धन जाधव, आमदार भाऊसाहेब चिकटकर यांचे कौतुक करण्यात आले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. फलटण एसटी आगार बंद ठेवण्यात आले आहे.