Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी फलटणला मुंडण 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2018 03:09 PM2018-07-29T15:09:26+5:302018-07-29T15:11:17+5:30

मराठा क्रांती मोर्च्याच्यावतीने फलटण येथील अधिकार गृह इमारतीसमोर आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेले बेमुदत ठिय्या आंदोलन रविवारी तीव्र केले. चौथ्या दिवशी काही तरुणांनी मुंडण करुन शासनाचा निषेध केला. 

Maratha Reservation: Mundan andolan for Maratha Reservation | Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी फलटणला मुंडण 

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी फलटणला मुंडण 

Next

सातारा - मराठा क्रांती मोर्च्याच्यावतीने फलटण येथील अधिकार गृह इमारतीसमोर आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेले बेमुदत ठिय्या आंदोलन रविवारी तीव्र केले. चौथ्या दिवशी काही तरुणांनी मुंडण करुन शासनाचा निषेध केला. 

मराठा समाजाला आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी फलटण तालुक्यातील सर्व मराठा बांधव एकत्र आला. आरक्षणाची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तहसील कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याने रविवारी सरकारच्या निषेधार्थ समाजातील अनेक तरुणांनी मुंडण केले. 

आंदोलनात सहभागी झालेल्यांनी ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा देत सारा परिसर दणाणून सोडला. त्यानंतर आंदोलनाला सुरुवात केली. शनिवारी राजुरी, मुंजवडी, बरड, पिंप्रद, गुणवरे, वाजेगाव, दुधेबावी, मिरढे, नाईकबोमवाडी, निंबळक आणि पंचक्रोशीतील मराठा समाजबांधव सहभागी झाले होते.

Web Title: Maratha Reservation: Mundan andolan for Maratha Reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.