जमीन खरेदीसाठी विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:29 AM2021-06-02T04:29:04+5:302021-06-02T04:29:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा: जमीन घेण्यासाठी साडेपाच लाख रुपये माहेरहून आणण्यासाठी पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी मुंबई ...

Marital harassment for land purchase | जमीन खरेदीसाठी विवाहितेचा छळ

जमीन खरेदीसाठी विवाहितेचा छळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा: जमीन घेण्यासाठी साडेपाच लाख रुपये माहेरहून आणण्यासाठी पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्यांसह सासरच्या चौघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

राजू शिवाजी जाधव (मुंबई पोलीस, नेमणूक घाटकोपर), कांताबाई शिवाजी जाधव, शिवाजी रामचंद्र जाधव (सर्व रा. सिद्धनाथवाडी, दत्तनगर वाई), सुरेश शिवाजी जाधव (रा. धनकवडी, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयितांनी मुंबईत घराला डिपॉझिटसाठी ५० हजार रुपये तसेच वाई येथे जागा घेण्यासाठी ५ लाख रुपये माहेरहून आण, अशी मागणी संबंधित विवाहिता विद्या राजू जाधव (वय २४) यांना केली. या कारणासाठी विवाहितेचा वेळोवेळी शारीरिक आणि मानसिक जाचहाट केला. तसेच तिला कोणत्याही कारणावरून मारहाण केली जात असे. याबाबत सातारा येथे भरोसा सेल येथेही या दाम्पत्याचे समुपदेशन झाले आहे. यानंतरही विवाहितेचा छळ सुरू आहे. शिवाय पती राजू जाधव याचे एका मुलीशी प्रेमसंंबंध असल्याबाबत पत्नीस माहीत होते. पतीच्या मोबाईलमध्ये त्यांचे फोटो मिळून आल्याबाबत विचारणा केल्यानंतरही तिला मारहाण करण्यात येत असल्याचे पीडित विवाहितेने फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला असून तपास हवालदार तावरे हे करत आहेत.

Web Title: Marital harassment for land purchase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.