निर्बंध झुगारून बाजारपेठ गजबजली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:43 AM2021-07-14T04:43:40+5:302021-07-14T04:43:40+5:30
सातारा : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सातारा जिल्ह्यात संचारबंदीचे निर्बंध पुन्हा एकदा कठोर करण्यात आले आहेत. मात्र, सततच्या निर्बंधांमुळे आता ...
सातारा : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सातारा जिल्ह्यात संचारबंदीचे निर्बंध पुन्हा एकदा कठोर करण्यात आले आहेत. मात्र, सततच्या निर्बंधांमुळे आता व्यापारी, विक्रेते व दुकानदार मेटाकुटीला आले आहेत. प्रशासनाचे निर्बंध झुगारून सोमवारी सातारा शहरातील काही दुकाने पूर्ण खुली करण्यात आली तर काही छुप्या पद्धतीने सुरू होती. शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिक खरेदीसाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याने बाजारपेठ गर्दीने गजबजून गेली.
राज्यासह सातारा जिल्ह्यात एप्रिल व मे महिन्यात कोरोनाचा अक्षरश: उद्रेक झाला. या दोन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येने नवे उच्चांक गाठले तर मृतांची संख्याही अधिक होती. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाºयांकडून टाळेबंदी लागू करण्यात आली. केवळ अत्यावश्यत सेवा सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली. बाधितांची संख्या हळूहळू कमी झाल्याने निर्बंध शिथिल करून बाजारपेठ पुन्हा खुली करण्यात आली. मात्र, काही दिवसांत निर्बंध पुन्हा कठोर करण्यात आले. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यास जिल्हाधिकाºयांकडून परवानगी देण्यात आली आहे.
सततच्या निर्बंधांमुुळे जिल्ह्यातील व्यापारी, दुकानदार हतबल झाले आहेत. बॅँका, पतसंस्थांचे कर्ज, वीज बिल, कर्मचाºयांचे पगार व उदनिर्वाह करणे कठीन बनू लागले आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल करून बाजारपेठ सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी व्यपाºयांनी मागणी आहे. मात्र, जिल्हाधिकाºयाकंडून याबाबत अद्याप ठोस निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे व्यापारी व दुकानदार टाळेबंदीचे निर्बंध झुगारून दुकाने उघडू लागले आहेत. सोमवारी शहरातील अत्यावश्यक सेवेसह इतर दुकानेही काही प्रमाणात उघडण्यात आली. त्यामुळे पोवई नाका, कर्मवीर पथ, खणआळी, पाचशे एक पाटी, मोती चौक येथे नागरिकांची खरेदीसाठी झुंबड पहायला मिळाली.
(चौकट)
जबाबदारी भान ओळखा...
कोरोना रुग्णसंख्या वाढण्यास प्रशासन जबाबदार आहे की नागरिक याची जाण नागरिकांनी ठेवणे गरजेचे आहे. फिजिकल डिस्टन्सचे पालन करा, मास्क, सॅनिटायझरचा वापर करा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा अशा सूचना प्रशासनाकडून सातत्याने केल्या जात आहेत. मात्र, नागरिक याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने कोरोनाची साखळी तुटण्याचे नाव घेईना. केवळ प्रशासनाावर अवलंबून राहता नागरिकांनी देखील नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. हे होत नसल्याने प्रशासनाला कठोर भूमीका घ्यावी लागत आहे.