पुसेसावळीत ७ मेपर्यंत बाजारपेठ बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:43 AM2021-04-28T04:43:04+5:302021-04-28T04:43:04+5:30
पुसेसावळी : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी संपूर्ण शहर बंद करण्याचा निर्णय पुसेसावळी ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये फक्त ...
पुसेसावळी : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी संपूर्ण शहर बंद करण्याचा निर्णय पुसेसावळी ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये फक्त मेडिकल दुकान व दवाखाने सुरू राहतील.
पुसेसावळी शहरातील कोरोना बाधित रुग्णसंख्येत होणारी वाढ रोखण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने कडक निर्बंध घालून शहर पूर्णतः बंद करणे अत्याव्यश्यक आहे. या काळात घरपोच दूध सेवा सुरू राहणार आहे. इतर सर्व दुकाने बंद राहतील.
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन किराणा मालासह भाजीपाला, कृषी अशी सर्व दुकाने बंद ठेवण्यात येत आहेत. तरी या काळात कोणी नियमांचे उल्लंघन केले तर ग्रामपंचायत प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येईल.
नागरिकांच्या हितासाठी आणि या आजारापासून बाधितांची संख्या थांबविण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या काळात नागरिकांनी व दुकानदारांनी सहकार्याची भूमिका ठेवावी, असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात आले आहे.