बाजार समिती निवडणूक: पत्नीचा अर्ज बाद, पतीचा पेटवून घेण्याचा प्रयत्न; अधिकाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे बचावले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 09:59 PM2023-04-06T21:59:57+5:302023-04-06T22:02:01+5:30

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रसंगावधान दाखविल्याने पुढील अनर्थ टळला.

Market Committee Election Wife's application rejected; husband's attempt to self fire; Due to the intervention of the authorities, lives were saved in satara | बाजार समिती निवडणूक: पत्नीचा अर्ज बाद, पतीचा पेटवून घेण्याचा प्रयत्न; अधिकाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे बचावले प्राण

बाजार समिती निवडणूक: पत्नीचा अर्ज बाद, पतीचा पेटवून घेण्याचा प्रयत्न; अधिकाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे बचावले प्राण

googlenewsNext

खंडाळा : लोणंद कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत पत्नीचा अर्ज बाद झाल्याने पतीने पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रसंगावधान दाखविल्याने पुढील अनर्थ टळला.

याबाबत अधिक माहिती अशी की, लोणंद शेती उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या निवडणुकीत अर्जाची छाननी करण्यात आली. यावेळी निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत प्रवर्गातून स्वाती आदेश जमदाडे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज भरला होता. दरम्यान, अर्ज छाननीत निर्धारित क्षेत्र नावावर नसल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज बाद केला. याच्या निषेधार्थ स्वाती जमदाडे यांचे पती शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे खंडाळा तालुकाध्यक्ष आदेश जमदाडे यांनी सहायक निबंधक कार्यालयात अंगावर पेट्रोल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.

शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे व अधिसूचनेमुळे शेतकऱ्यावर अन्याय झाला आहे, असे सांगत आदेश जमदाडे यांनी लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक कार्यालयात जाऊन अंगावर पेट्रोल ओतून घेतले. अचानकपणे घडलेल्या या प्रकारामुळे कार्यालयात एकच गोंधळ उडून गेला. यावेळी त्या ठिकाणी सहायक निबंधक देविदास मिसाळ, ज्ञानेश्वर चव्हाण हे उपस्थित होते. त्यांनी प्रसंगावधान दाखविल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेमुळे खंडाळा तहसीलदार कार्यालयात व सहायक निबंधक कार्यालयात खळबळ उडाली आहे.

निवडणुकीत १२ अर्ज अवैध -
बाजार समितीच्या १८ जागांसाठी एकूण १०० उमेदवारी अर्ज भरले गेले होते. यापैकी १२ अर्ज अवैध ठरविण्यात आले असून ८८ अर्ज पात्र धरण्यात आले आहेत. यामध्ये सोसायटी मतदार संघातून सर्वसाधारणच्या सात जागांसाठी ४४ ,महिला दोन जागांसाठी ७, इतर मागास प्रवर्गच्या एका जागेसाठी ३, विमुक्त जाती जमातीच्या एका जागेसाठी ४ असे उमेदवारी अर्ज वैध झाले असून, ग्रामपंचायत मतदार संघातून सर्वसाधारण दोन जागांसाठी १४ , अनुसूचित जाती जमातीच्या एका जागेसाठी ४, आर्थिक दुर्बलच्या एका जागेसाठी १ अर्ज पात्र ठरले. व्यापारी आडते मतदार संघातून दोन जागांसाठी ६ अर्ज वैध झाले असून हमाल व तोलारी मतदार संघातून एका जागेसाठी ५ अर्ज वैध झाले आहेत.
 

Web Title: Market Committee Election Wife's application rejected; husband's attempt to self fire; Due to the intervention of the authorities, lives were saved in satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.