सोशल डिस्टन्सिंगचा मंडईत फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:35 AM2021-01-18T04:35:42+5:302021-01-18T04:35:42+5:30
मंडईत फज्जा सातारा : लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून साताऱ्यातील बाजारपेठेत नागरिकांनी खरेदीसाठी झुंबड उडत आहे. मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्सचे ...
मंडईत फज्जा
सातारा : लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून साताऱ्यातील बाजारपेठेत नागरिकांनी खरेदीसाठी झुंबड उडत आहे. मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्सचे पालन करा, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे; परंतु नागरिकांकडून या नियमांची पायमल्ली केली जात आहे. शहरातील सर्वच भाजी मंडईत सोशल डिस्टन्स हा शब्द केवळ नावापुरताच उरला आहे. बाजार समिती, महात्मा फुले, पोवई नाका व प्रतापसिंह भाजी मंडईत नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडत आहे. कोरोनाचे संक्रमण नियंत्रणात आल्याने नागरिक, दुकानदार, विक्रेते निर्धास्त झाले आहेत.
साताऱ्याचा पारा
३२ अंशांवर
सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात थंडीची तीव्रता काही प्रमाणात ओसरली आहे. हवामान विभागाने रविवारी सातारा शहराचे कमाल तापमान ३२.६, तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअस इतके नोंदविले आहे. वातावरणात सतत बदल होत असून, सायंकाळनंतर हवेत गारव्याचे प्रमाण वाढत आहे. महाबळेश्वर तालुक्यात मात्र थंडीची तीव्रता कायम आहे. रविवारी येथील कमाल तापमान २६.१, तर किमान तापमान १६.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. पर्यटक येथील अल्हाददायी वातावरणाचा मनमुराद आनंद लुटत आहेत.
डांबरीकरणाचे काम
मार्गी लावण्याची गरज
किडगाव : मोळाचा ओढा ते वर्ये या मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गाच्या डांबरीकरणाचे काम हाती घेतले आहे. सध्या या मार्गावर केवळ लहान-मोठी खडी टाकण्यात आली आहे. त्यामुळे ये-जा करताना वाहनधारकांना धुळीचा प्रचंड सामना करावा लागत असून, अपघातही घडू लागले आहेत. बांधकाम विभागाने डांबरीकरणाचे काम मार्गी लावून वाहनधारकांची परवड थांबवावी, अशी मागणी होत आहे.