Satara: साखरपुड्यात नऊ लाख खर्च करूनही लग्न मोडलं, डॉक्टरसह तिघांवर गुन्हा दाखल
By दत्ता यादव | Published: September 6, 2023 03:44 PM2023-09-06T15:44:40+5:302023-09-06T15:46:01+5:30
सातारा : शहरातील एका नामवंत हाॅटेलमध्ये धुमधडाक्यात साखरपुडा झाला. या साखरपुड्यात ९ लाख ६३ हजार रुपये खर्च केला. मात्र, त्यानंतर लग्न न करताच मुलाकडील मंडळींनी फसवणूक केल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी सातारा शहर ...
सातारा : शहरातील एका नामवंत हाॅटेलमध्ये धुमधडाक्यात साखरपुडा झाला. या साखरपुड्यात ९ लाख ६३ हजार रुपये खर्च केला. मात्र, त्यानंतर लग्न न करताच मुलाकडील मंडळींनी फसवणूक केल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात दिली. याप्रकरणी एका डाॅक्टरसह तिघांवर फणवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
डाॅ. गिरीश बाळकृष्ण कदम, बाळकृष्ण बाजीराव कदम, शीला बाळकृष्ण कदम (रा. शाहूनगर, गोडोली, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, यातील तक्रारदार हे ७० वर्षांचे असून, ते मूळचे मुंबईचे आहेत. त्यांच्या डाॅक्टर असलेल्या मुलीसोबत वरील संशयितांनी साताऱ्यातील एका नामवंत हाॅटेलमध्ये साखरपुडा केला. या साखरपुड्यात मुलीच्या वडिलांनी ९ लाख ६३ हजार रुपये खर्च केला. मात्र, त्यांच्या मुलीशी लग्न न करता त्यांची फसवणूक केली. यामुळे सामाजिक बदनामी व आर्थिक नुकसानही झाले असल्याचे मुलीच्या वडिलांनी तक्रारीत नमूद केले आहे. सहायक पोलिस निरीक्षक पालवे हे अधिक तपास करीत आहेत.