साताऱ्यातील विवाहितेचा पुण्यात जाचहाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:39 AM2021-09-19T04:39:35+5:302021-09-19T04:39:35+5:30

सातारा : पत्नी गर्भवती असतानाही वडिलांकडून दहा लाख रुपये आणावेत म्हणून तिला मारहाण करणाऱ्या पतीसह सासू, सासऱ्यावर सातारा शहर ...

Marriage of a married woman from Satara in Pune | साताऱ्यातील विवाहितेचा पुण्यात जाचहाट

साताऱ्यातील विवाहितेचा पुण्यात जाचहाट

Next

सातारा : पत्नी गर्भवती असतानाही वडिलांकडून दहा लाख रुपये आणावेत म्हणून तिला मारहाण करणाऱ्या पतीसह सासू, सासऱ्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुष्पलता वारे, दीपक वारे आणि पुष्पदीप वारे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून, या सर्वांनी पुण्यामध्ये छळ केला असल्याचे विवाहितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सोनिया पुष्पदीप वारे (वय २४, रा. सुखवानी एनक्लीओ, जी बिल्डिंग, फ्लॅट नंबर ३, वाघेरे कॉलनी नंबर ४, पिंपरीगाव, ता. हवेली, जि. पुणे. सध्या रा. महागाव, ता. सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्या गर्भवती असल्याचे माहिती असतानाही सासू पुष्पलता दीपक वारे, सासरे दीपक पतंगराव वारे, पती पुष्पदीप दीपक वारे (सर्व रा. सुखवानी एनक्लीओ, जी बिल्डिंग, फ्लॅट नंबर ३, वाघेरे कॉलनी नंबर ४, पिंपरीगाव, ता. हवेली, जि. पुणे.) यांनी छळ केला. तुझे वडील बँकेत मोठ्या पदावर असून, त्यांच्याकडून हिंजवडी येथे फ्लॅट घेण्यासाठी दहा लाख रुपये घेऊन ये आणि बाकीच्या पैशांसाठी तुझ्या वडिलांच्या नावावर कर्ज काढून फ्लॅट खरेदी करुया, असे म्हणत वारंवार मारहाण, शिवीगाळ करून दमदाटी करण्याबरोबरच शारीरिक आणि मानसिक छळ केला. हा संपूर्ण प्रकार जून २०१९ ते दि. १६ सप्टेंबर २०२१ या कालावधीत घडला आहे.

दरम्यान, सोनिया या माहेरी महागाव येथे असताना पती पुष्पदीप हा दारू पिऊन घरी आला आणि दहा लाख रुपये तयार आहेत का, मला ते आता पाहिजेत नाही तर मी मुलाला घेऊन जाईन, असे म्हणून हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांना सोडविण्यासाठी वडील आले असता त्यांनाही मारहाण केली. याप्रकरणी सोनिया यांनी शुक्रवार, दि. १७ रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर याप्रकरणी पुष्पलता वारे, दीपक वारे आणि पुष्पदीप वारे या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार भोसले करत आहेत.

Web Title: Marriage of a married woman from Satara in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.