एक लाखासाठी विवाहितेचा जाचहाट, चौघांवर गुन्हा; पोलिसांकडून तपास सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 12:23 PM2019-02-22T12:23:19+5:302019-02-22T12:24:44+5:30
माहेरहून एक लाख रुपये घेऊन यावे, यासाठी पूजा गौरव महामुलकर (वय २२, मूळ रा. लिंबफाटा घुले वस्ती. सध्या रा. गोटेवाडी, ता. तासगाव, जि. सांगली) या विवाहितेचा जाचहाट केल्याच्या आरोपावरून सातारा तालुका पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : माहेरहून एक लाख रुपये घेऊन यावे, यासाठी पूजा गौरव महामुलकर (वय २२, मूळ रा. लिंबफाटा घुले वस्ती. सध्या रा. गोटेवाडी, ता. तासगाव, जि. सांगली) या विवाहितेचा जाचहाट केल्याच्या आरोपावरून सातारा तालुका पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
गौरव दत्तात्रय महामुलकर, सुजाता दत्तात्रय महामुलकर, शुभम दत्तात्रय महामुलकर, दत्तात्रय शिवाजी महामुलकर (सर्व रा. घुले वस्ती ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
विवाहिता पूजा महामुलकर हिने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, वरील संशयितांनी तू आम्हाला पसंत नाहीस, आमच्या घरात शोभत नाहीस तसेच माहेरहून एक लाख रुपये घेऊन यावे, यासाठी वारंवार मानसिक आणि शारीरिक जाचहाट केला. तसेच उपाशीपोटी ठेवून घरातून हाकलून दिले.