हुतात्मा स्मारकाला मिळणार झळाळी...अकरा लाखांचा निधी मंजूर, कऱ्हाड नगरपालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:41 AM2018-03-16T00:41:17+5:302018-03-16T00:41:17+5:30

कऱ्हाड : स्वातंत्र्यसंग्रामातील युद्धामध्ये ज्यांनी आपल्या प्र्राणांची आहुती दिली. त्या वीर हुतात्मांच्या स्मरणार्थ येथील कोल्हापूर नाका येथे हुतात्मा स्मारक उभे करण्यात आले आहे.

Martyr's memorial gets a glimpse of ... eleven lakhs sanctioned, Karhad municipality | हुतात्मा स्मारकाला मिळणार झळाळी...अकरा लाखांचा निधी मंजूर, कऱ्हाड नगरपालिका

हुतात्मा स्मारकाला मिळणार झळाळी...अकरा लाखांचा निधी मंजूर, कऱ्हाड नगरपालिका

Next

कऱ्हाड : स्वातंत्र्यसंग्रामातील युद्धामध्ये ज्यांनी आपल्या प्र्राणांची आहुती दिली. त्या वीर हुतात्मांच्या स्मरणार्थ येथील कोल्हापूर नाका येथे हुतात्मा स्मारक उभे करण्यात आले आहे. या स्मारकाच्या डागडुजीसाठी अकरा लाख रुपये निधी पालिकेस प्राप्त झाला असून, त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे लवकरच या स्मारकाच्या डागडुजीचे काम पालिकेकडून हाती घेतले जाणार आहे.

बॅरिस्टर ए. आर. अंतुले हे मुख्यमंत्री असताना त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र हुतात्मा स्मारके उभारण्याची योजना राबविली. प्रत्येक ठिकाणी दोन एकर जागा संपादन करून राज्यात २६८ ठिकाणी शासकीय खर्चाने अशी स्मारके उभारण्यात आली. त्या योजनेंतर्गत कºहाडच्या दक्षिणेकडे पुणे-बेंगलोर महामार्गाच्या कडेला असलेल्या सेवारस्त्याजवळ रिमांड होम परिसरात स्वातंत्र्य लढार्इंमध्ये वीरगती प्राप्त केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हुतात्मा स्मारक उभारण्यात आले. त्याठिकाणी सुसज्ज गं्रथालयासाठी खोलीही बांधण्यात आली आहे.

पालिकेकडे देखभालीसाठी असलेले हुतात्मा स्मारक देखभाली अभावी तसेच उभे आहे. हे स्मारक १५ आॅगस्ट व २६ जानेवारी, ९ आॅगस्ट, हुतात्मा दिन असे दिवस सोडले की, स्मारक बंद ठेवले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून पालिकेकडून तात्पुरत्या स्वरुपात डागडुजी केली जात होती. मात्र, यावर्षी अकरा लाख रुपयांची निधीची तरतूद डागडुजीसाठी करण्यात आली आहे. लवकरचया स्मारकाच्या डागडुजीच्या कामास प्रारंभ करण्यात येणार असल्याची चिन्हे आहेत.

इथे आहेत हुतात्मा स्मारके अन् स्मृतिस्तंभ...

तहसीलदार कार्यालय
१९४२ च्या क्रांती आंदोलनातील मोर्चाच्या स्मरणार्थ स्मृतिस्तंभ उभारला आहे.

नगरपालिका कार्यालय
भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ स्मृतिस्तंभ उभारला आहे.

पंचायत समिती कार्यालय
स्वातंत्र्य लढाईत वीरगती प्राप्त केलेल्या शूरवीरांच्या स्मरणार्थ उभारलेला स्मृतिस्तंभ

कार्वे नाका
आॅलिम्पिक विजेते खाशाबा जाधव यांच्या स्मरणार्थ उभारलेला स्मृतिस्तंभ

कोल्हापूर नाका
मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले हे मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्रात सर्वत्र हुतात्मा स्मारके उभारण्याची योजना राबविली. त्या योजनेंतर्गत हुतात्मा स्मारक उभारले आहे.


दोन वर्षांनंतर होणार नूतनीकरणाचे काम...
कºहाडच्या कोल्हापूर नाक्यावर पालिकेच्या असलेल्या हुतात्मा स्मारकाची यापूर्वी १० मे २०१६ मध्ये डागडुजी करण्यात आली होती. त्यानंतर आता दोन वर्षांनी पालिकेकडून येथील कमान, हुतात्मा स्मारक, परिसरातील बगिचा, ग्रंथालय खोली, बैठक व्यवस्था याचे नूतनीकरण केले जाणार आहे.

 

कऱ्हाड पालिकेच्या वतीने यावर्षी विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. चोवीस तास पाणीपुरवठा योजना, यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन तसेच स्वामीबाग आदींची कामे पूर्ण केली जात आहेत. त्याप्रमाणे येथील कोल्हापूर नाक्यावरील हुतात्मा स्मारकाच्या नूतनीकरणासाठी अकरा लाख रुपये निधी मिळाला असून, लवकरच नूतनीकरणाच्या कामास प्रारंभ करण्यात येणार आहे.
- यशवंत डांगे, मुख्याधिकारी, कऱ्हाड पालिका

Web Title: Martyr's memorial gets a glimpse of ... eleven lakhs sanctioned, Karhad municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.