मसूर पोलिसांचा कारवाईचा धडाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:57 AM2021-02-23T04:57:53+5:302021-02-23T04:57:53+5:30
मसूरचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी विनामास्क फिरणारे व बेशिस्तपणे दुचाकीवर प्रवास करणाऱ्यांवर कारवाई केली. गत ...
मसूरचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी विनामास्क फिरणारे व बेशिस्तपणे दुचाकीवर प्रवास करणाऱ्यांवर कारवाई केली. गत दोन दिवसांमध्ये सुमारे दीडशे दुचाकीधारकांवर कारवाई करून त्यांच्याकडून सुमारे वीस हजार रुपये दंड वसूल केला.
मसूरच्या मुख्य चौकात तसेच दूरक्षेत्राच्या हद्दीत विविध ठिकाणी पोलिसांनी धडक मोहीम राबवत बेशिस्तपणे दुचाकीवरून जाणारे, ट्रिपल सीट जाणारे, वाहनाची कागदपत्रे नसणाऱ्या वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारला. तसेच विनामास्क फिरणाऱ्या पन्नास ग्रामस्थांकडून दंड वसूल केला. सहायक फौजदार तावरे, गणेश भोसले, हवालदार राजेंद्र साळुंखे, पोलीस नाईक कृष्णा साळुंखे, कॉन्स्टेबल अमोल देशमुख यांनी ही कारवाई केली.
- कोट
बेशिस्तपणे कायद्यांचे उल्लंघन करत दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. तसेच विनामास्क वावरणाऱ्या ग्रामस्थांकडून दंड वसूल केला जात आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाचे नियम पाळून सहकार्य करावे.
- प्रवीण जाधव
पोलीस उपनिरीक्षक, मसूर
फोटो : २२केआरडी०१
कॅप्शन : मसूर, ता. कऱ्हाड येथे पोलिसांकडून वाहनधारकांवर कारवाई करण्यात येत आहे.