मटकाकिंग कच्छीच्या बंगल्यात २ तडीपार गुंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 11:11 PM2018-08-02T23:11:39+5:302018-08-02T23:11:49+5:30
सातारा : उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राजमाने यांच्या पथकाने बुधवारी रात्री मटकाकिंग सलीम कच्छी याच्या सैदापूर येथील बंगल्यावर छापा टाकला. यात पोलिसांनी २ लाख रुपयांच्या मुद्देमालासह ४० जणांना अटक केली. त्यामध्ये तडीपार गुंड प्रभाकर बलदेव मिश्रा (रा. एमआयडीसी, सातारा) व वसीम इब्राहिम शेख (रा. रविवार पेठ, सातारा) यांचा समावेश आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राजमाने यांच्या पथकाने राजवाडा परिसरातील सचिन प्रल्हाद सुपेकर (रा. गुरुवार पेठ, सातारा) याच्या जुगारअड्ड्यावर छापा टाकला. यावेळी १३ जणांना ताब्यात घेतले तसेच त्यांच्याकडून ४१ हजार ८५ रुपयांची रोकड व जुगार साहित्य जप्त केले. ताब्यातील आरोपींकडे चौकशी केल्यानंतर मटकाकिंग सलीम कच्छी याच्या सैदापूर येथील बंगल्यातून मोबाईलवर मटका अड्डा चालत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार राजमाने यांच्यासह पोलिसांनी सैदापूर येथील बंगल्यावर छापा टाकला. बंगल्यातील दुसऱ्या मजल्यावरून प्रिंटर, कॅल्क्युलेटर, एलईडी टीव्ही व जुगार साहित्य ताब्यात घेतले. यावेळी तिसºया मजल्यावर लपलेल्या २२ जणांना अटक केली. त्यामध्ये तडीपार गुंड प्रभाकर बलदेव मिश्रा (रा. एमआयडीसी, सातारा) व वसीम इब्राहीम शेख (रा. रविवार पेठ, सातारा) यांना अटक केली. या सर्वांकडून १ लाख ४ हजार ३३७ रुपयांची रोकड व जुगार साहित्य जप्त केला.
..अन् ‘दया स्टाईल’चा वापर
गजानन राजमाने यांच्या पथकाने मटकाकिंग सलीम कच्छीची सैदापूर येथील बंगल्यावर छापा टाकला. मात्र, बंगल्याचा दरवाजा बंद असल्याने तो ‘दया स्टाईल’ने तोडला. त्यावेळी २३ आरोपी हे बंगल्यातील जिममध्ये लपले होते. त्यांना ताब्यात घेतले.