माउलींची पालखी निराकाठी विसावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 03:20 PM2019-07-02T15:20:31+5:302019-07-02T15:29:08+5:30
विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. माउलींची पालखी मंगळवारी सकाळी पुणे जिल्ह्याच्या सीमेवेरील निराकाठी विसावली. माउलींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली असून काही वेळेतच निरा स्नान हा महत्त्वपूर्ण सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर माउलींचे सातारा जिल्ह्यात उत्साहात स्वागत करण्यात येईल.
सातारा/लोणंद : विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. माउलींची पालखी मंगळवारी सकाळी पुणे जिल्ह्याच्या सीमेवेरील निराकाठी विसावली. माउलींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली असून काही वेळेतच निरा स्नान हा महत्त्वपूर्ण सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर माउलींचे सातारा जिल्ह्यात उत्साहात स्वागत करण्यात येईल. पुणे जिल्हयातून आज ज्ञानेश्वर महाराजांची पालखी नीरा नदीच्या काठी आली आहे . दुपारी नीरा स्नान केल्यावर पालखी लोणंदमध्ये दाखल होईल.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सकाळीच वाल्हे येथील मुक्काम संपवून सातारा जिल्ह्याच्या दिशेने निघाला. सकाळपासून असंख्य दिंड्या जिल्ह्यात येऊ लागल्या. ज्ञानोबा माउली, तुकारामचा जयघोष करत वारकरी लोणंदमध्ये येत आहेत.
ठिकठिकाणी राहुट्या टाकल्या असून तेथे वारकरी विश्रांती घेत आहेत. वारकऱ्यांना कसल्याही गैरसोयीचा सामना करावा लागू नये यासाठी सातारा जिल्हा प्रशासन झाले आहेत.