खासगी रुग्णालयांमध्ये १ मेपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:49 AM2021-04-30T04:49:12+5:302021-04-30T04:49:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा दि. १ मेपासून सुरू होत आहे. तथापि, १८ ते ४४ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा दि. १ मेपासून सुरू होत आहे. तथापि, १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण खासगी रुग्णालयांमध्ये सशुल्क करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आली आहे.
याबाबत देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दि. १६ जानेवारी २०२१ पासून कोविड लसीकरण कार्यक्रम सुरू आहे. याअंतर्गत आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स, ४५ वर्षांवरील नागरिकांचे कोविड लसीकरण टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे. त्यानंतर आता १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. तथापि, सद्य:स्थिती पाहता या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण खासगी हॉस्पिटलमध्ये सशुल्क करण्यात येणार आहे. त्यासाठी https://selfregistration.cowin.gov.in/ या लिंकचा वापर करून आपल्या नावाची नोंदणी करायची आहे. पुढील आदेश येईपर्यंत शासकीय लसीकरण केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण होणार नाही. त्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी शासकीय लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.